शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोविड रुग्णालये पुन्हा कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 12:39 AM

काेरोनाचा मुकाबला करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे अपुरी आरोग्य व्यवस्था होती. त्यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाने जम्बो कोविड रुग्णालये तातडीने उभी करण्यात आली. काही कोविड रुग्णालये सुरू होऊन सेवा देत होती, तर काही रुग्णालये लाट ओसल्यावर बंद झाली होती.  त्यामुळे भविष्यात कोरोना जाणार की नाही, याची हमी नसल्याने ही कोविड रुग्णालये तशीच पडून होती. कोरोनाची पहिली लाट ओसरली तेव्हा काही कोविड रुग्णालये बंद करण्यात आली. मात्र दुसरी लाट येताच महापालिकेने पुन्हा ही रुग्णालये सुरू केली आहेत.कोरोना प्रादुर्भाव वाढला तेव्हा पालिकेने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू केले. त्यानंतर जम्बो सेटअप उभारण्याची तयारी पालिकेने केली. डोंबिवली क्रीडा सुंकल, डोंबिवली जिमखाना, पाटीदार भवन, वसंत व्हॅली, आर्ट गॅलरी, आसरा फाऊंडेशन या ठिकाणी कोविड रुग्णालये सुरू केली. पहिल्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ३९१ पदे तातडीने भरली होती. दुसरी लाट आल्याने या काम करणाऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. सरकारकडून मिळालेल्या निधीतून गौरीपाडा येथे पीपीपी तत्त्वावर कृष्णा डायग्नोस्टिक या खासगी कंपनीच्या माध्यमातून लॅब उभारली. ही लॅब आजही कार्यरत आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने पाटीदार, वसंत व्हॅली, आसरा फाऊंडेशन ही कोविड रुग्णालये बंद केली होती. आर्ट गॅलरी बांधून तयार होते. त्याचा वापर केला गेला नव्हता. फेब्रुवारीनंतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. आता दिवसाला एक हजारापेक्षा जास्त रुग्ण महापालिका हद्दीत आढळून येत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १५ हजारांच्या आसपास आहे. कोरोना रुग्णालये पुन्हा सुरू केली आहेत. पाटीदार भवन येथील कोविड रुग्णालय सुरू केले आहे. त्या ठिकाणी २१० बेड्सची व्यवस्था आहे. तळमजल्यावर आणखी १०० बेड्स देण्यात आले आहेत. आर्ट गॅलरी येथे २६९ ऑक्सिजन आणि १०९ आयसीयू बेड्सची व्यवस्था आहे. वसंत व्हॅली येथे ६४ बेड्सचे सेंटर पुन्हा सुरू केले आहे. त्याचबरोबर टिटवाळा येथील रुख्मिणी प्लाझा इमारतीत ६० बेड्सचे रुग्णालय सुरू झाले आहे. आसरा फाऊंडेशनचे कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करता आले नाही. त्या ठिकाणचे ऑक्सिनजचे पाइप काढून टाकले होते. त्याची नव्याने प्रक्रिया राबविण्याऐवजी टिटवाळ्यात रुग्णालय सुरू केले आहे, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस