शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

केडीएमटी खाजगीकरणाचा प्रस्ताव अद्याप बासनातच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 11:34 PM

आता ‘जीसीसी’चा नवा पर्याय : राज्य सरकारचे केडीएमसीला पत्र

प्रशांत मानेकल्याण : खर्च आणि उत्पन्नातील वाढती तफावत पाहता केडीएमटी उपक्रम चालवायचा तरी कसा,असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला असताना उपक्रमाचे खाजगीकरण करण्याच्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र पाठवून परिवहन उपक्रम ग्रॉस कॉस्ट कॉण्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्त्वावर चालवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे खाजगीकरणाकडे झाले नसताना आता सरकारने घेतलेल्या ग्रॉस कॉस्टच्या निर्णयाची अंमलबजावणी होते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

डबघाईला आलेल्या केडीएमटी उपक्रमाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सत्ताधारी व विरोधी पक्षांनी घेतला. वर्षभरापूर्वी त्याबाबतचा प्रस्ताव केडीएमसी प्रशासनाकडे पाठविला आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी खाजगीकरण होणे आवश्यक असले तरी उपक्रमातील कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत सामावून घेणे ही प्रक्रियाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परिवहन बस खाजगी व्यक्ती अथवा संस्थेने चालवाव्यात, त्याबदल्यात ठरावीक रक्कम परिवहनला रॉयल्टी स्वरूपात द्यायची, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. पण, आजवर आयुक्त बोडके यांच्याकडून संबंधित प्रस्तावाबाबत कोणतीही कृती झालेली नाही. अगोदरच केडीएमटीचे उत्पन्न कमी आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भार, बस देखभाल-दुरुस्ती आदी खर्च भागवताना वेळोवेळी केडीएमटी व्यवस्थापनाला महापालिका प्रशासनासमोर हात पसरावे लागत आहेत. प्रशासनाकडून मिळणारे अनुदान हे पुरेसे नसल्याने उपक्रम चालवणे जिकरीचे होऊन बसले आहे. उपक्रमाला मिळणाºया दैनंदिन उत्पन्नाचा आढावा घेता आजच्या घडीला पाच लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. सध्या ७५ ते ८० बस रस्त्यावर धावत आहेत. एका किलोमीटरमागे उपक्र माला ३८ रुपये उत्पत्न मिळते, पण खर्च ८९ रुपये इतका होतो. ५१ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. तांत्रिक बिघाड होऊन रस्त्यातच बस बंद पडणे, टायर पंक्चर होणे, किरकोळ आगीच्या घटना अधूनमधून घडतच असतात. कंत्राटदारांची कोट्यवधींची बिलेही अदा करणे उपक्रमाला शक्य होत नाही. दरम्यान कंत्राटाच्या माध्यमातून सुरू केलेली वार्षिक देखभाल-दुरुस्ती (एएमसी)काही प्रमाणात उपक्रमासाठी फायदेशीर ठरली असली तरी एकूणच उपक्रमाची सध्याची स्थिती पाहता उपक्रमाचे खाजगीकरण करणे तसेच जीसीसी तत्त्वावर तो चालवण्याशिवाय पर्याय नाही, असा सूर उपक्रमातून उमटत आहे.देशभरातील दिल्ली, अहमदाबाद, सुरत तसेच मुंबई येथे जीसीसी तत्त्वावर चालवण्यात येणारी परिवहन सेवा विचारात घेता कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाची सेवा खाजगी बस प्रवर्तन सहभाग (जीसीसी)तत्त्वावर चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे पत्र ३० आॅगस्टला आयुक्त गोविंद बोडके यांना पाठवण्यात आले आहे. सध्या ठाणे, मीरा भार्इंदर, वसई विरार, नवी मुंबई या महापालिकांमधील परिवहन उपक्रमांमध्ये जीसीसीची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे आयुक्त बोडके काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.जीसीसी म्हणजे काय?कंत्राटदाराला केडीएमटी उपक्रमाच्या बस कंत्राट पद्धतीने काही अटी-शर्तींवर चालवायला द्यायच्या. यामध्ये बसच्या दररोजच्या संचलनाप्रमाणे दर किलोमीटरमागे ठरावीक रक्कम कंत्राटदाराला द्यायची असते.राज्य सरकारकडून जीसीसी तत्त्वावर उपक्रम चालविण्यासंदर्भात पत्र आले आहे. पण मधल्या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. त्यामुळे निर्णय घेता आलेला नाही. आता लवकरच बैठक घेऊन उचित निर्णय घेतला जाईल. - गोविंद बोडके, आयुक्त, केडीएमसी

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाBus Driverबसचालक