काशीमीरा पोलिसांनी सराईत २ वाहन चोरांना पकडून ६ गुन्हे आणले उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 07:59 PM2021-10-22T19:59:10+5:302021-10-22T19:59:17+5:30

शुक्रवार २२ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली. 

Kashimira police caught 2 vehicle thieves in Sarai and brought 6 crimes | काशीमीरा पोलिसांनी सराईत २ वाहन चोरांना पकडून ६ गुन्हे आणले उघडकीस

काशीमीरा पोलिसांनी सराईत २ वाहन चोरांना पकडून ६ गुन्हे आणले उघडकीस

Next

मीरारोड -  काशीमीरा पोलिसांनी दोघा सराईत वाहन चोरांना बेड्या ठोकत त्यांच्या कडून २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करत ६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत  शुक्रवार २२ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली. 

सहायक पोलिस आयुक्त विलास सानप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक विजय पवार व जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र भामरे व प्रशांत गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक जावेद मुल्ला व पथकाने वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत  निंकू सिसोदिया (२०) व रोहित भट (२१) यांना १५ रोजी अटक केली. 

आरोपीची कसून चौकशी केली असता काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत ३ ; नयानगर पोलीस ठाणे हद्दीत २ आणि दहिसर पोलीस ठाणे हद्दीत १ असे ६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या कडून चोरलेल्या ३ दुचाकी, ५ मोबाईल , २ हजार रोख रक्कम, ४७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, चोरीसाठीची मास्टर चावी असा २ लाख ८८ हजार  रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

 

Web Title: Kashimira police caught 2 vehicle thieves in Sarai and brought 6 crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app