कापूरबावडी भागात एकाच दिवशी चोरटयांनी तीन घरे फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 21:44 IST2021-04-21T21:42:15+5:302021-04-21T21:44:01+5:30

कापूरबावडी भागात सोमवारी एकाच रात्री चोरटयांनी तीन घरांमध्ये चोरी केली. बाळकूम येथील सिद्धेश्वर अहिरराव यांच्यासह तीन घरांमधून चोरटयांनी तब्बल दोन लाख एक हजार ७२० रुपयांचा ऐवज लुबाडला.

In Kapurbawdi area, thieves broke into three houses on the same day | कापूरबावडी भागात एकाच दिवशी चोरटयांनी तीन घरे फोडली

कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्देनागरिकांमध्ये चिंताकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कापूरबावडी भागात सोमवारी एकाच रात्री चोरटयांनी तीन घरांमध्ये चोरी केली. बाळकूम येथील सिद्धेश्वर अहिरराव यांच्यासह तीन घरांमधून चोरटयांनी तब्बल दोन लाख एक हजार ७२० रुपयांचा ऐवज लुबाडला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
बाळकूम येथील रहिवाशी अहिरराव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटयांनी १९ एप्रिल रोजी शिरकाव केला. त्यावेळी एक लाख ३३ हजार ७२० रुपयांच्या रोकडसह दागिनेही चोरटयांनी लंपास केले. त्याचबरोबर दशरथ नरोटे यांच्या घरातील सहा हजारांची रोकड लंपास करण्यात आली. तर रघुनाथ जाधव यांच्या घरातून दहा हजारांची रोकड आणि दहा हजार ५०० रुपयांची सोनसाखळी असा दोन लाख एक हजार ७२० रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला. याप्रकरणी २० एप्रिल रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर. डी. तोरडमल हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: In Kapurbawdi area, thieves broke into three houses on the same day