Kalyan CoronaVirus: Five new Kareena patients found in Kalyan-Dambivli | CoronaVirus : चिंता वाढली! कल्याण-डाेंबिवलीत काेराेनाचे पाच नवे रुग्ण, संख्या पोहोचली १९ वर

CoronaVirus : चिंता वाढली! कल्याण-डाेंबिवलीत काेराेनाचे पाच नवे रुग्ण, संख्या पोहोचली १९ वर

कल्‍याण : कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी पाच नवीन रुग्‍ण आढळून आले, त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्‍या आता 19  झाली आहे. नवीन रुग्णांपैकी चार रुग्ण हे डोंबिवली पूर्व भागातील असून 1 रुग्‍ण कल्‍याण पूर्व भागातील आहे. डोंबिवलीतील चार रुग्णांपैकी 3 रुग्‍ण हे लग्न सोहळ्याशी संबधीत असून 1 रुग्‍ण कोरोना बाधित रुग्‍णाच्या संपर्कातील आहे. नवीन रुग्‍णांपैकी कल्‍याण पूर्व येथील रूग्‍ण हा एका खाजगी रूग्‍णालयात उपचार घेत असून डोंबिवली येथील चारही रूग्‍ण कस्‍तुरबा रूग्‍णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.

कल्‍याण शहरात प्रथम आढळलेला कोरोना बाधित रुग्‍ण व त्‍याचे दोन कुटुंबीय उपचारांती पूर्णपणे बरे झाले आहेत आणि त्‍यांना डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी साेडण्यात आले आहे. सध्‍या  महानगरपालिका क्षेत्रातील पूर्णपणे डिस्चार्ज दिलेल्‍या रुग्‍णांची संख्‍या 4 आहे. महापालिकेमार्फत महापालिकेचे शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली हे विलगीकरण रूग्‍णालय म्‍हणून घोषित केले आहे.

Web Title: Kalyan CoronaVirus: Five new Kareena patients found in Kalyan-Dambivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.