शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण एपीएमसी निवडणूक: मनसे, राष्ट्रवादीसाठी भाजपाची रसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:36 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ जागांसाठी रविवार, १७ मार्चला मतदान होत असून त्यासाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ जागांसाठी रविवार, १७ मार्चला मतदान होत असून त्यासाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपामध्ये युती नाही. त्यामुळे भाजपानेमनसे व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेला एकटे पाडण्याचा भाजपाचा हा डाव बाजार समितीच्या निवडणुकीत चांगलाच रंगला आहे. मात्र, राजकीय नेत्यांनी मतदारयादीतील घोळ दूर करण्यावर भर दिलेला नाही. दुसरीकडे याविषयी प्रशासकीय यंत्रणेने हात वर केले आहेत. त्यामुळे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे.सरकारच्या नव्या नियमानुसार १८ जागांसाठी बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, दोन जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्याने १६ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याकरिता ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, २१ हजार ६७ मतदार आहेत. परंतु, दोन जागा बिनविरोध निवडून आल्याने रविवारी निवडणुकीत १८ हजार ५३० मतदार मतदान करणार आहे. १५ जागा या शेतकरी मतदारांसाठी आहेत. एक जागा हमाल-तोलाई व एक जागा व्यापारी-अडते यांच्यासाठी आहे. यापूर्वी शेतकऱ्याला प्रत्यक्ष मतदानाचा हक्क नव्हता. परंतु, आता शेतकरी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदारयादीत घोळ असल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांसह मतदारांनी नोंदवल्या आहेत. मात्र, त्याची दखल सरकारी यंत्रणेने घेतलेली नाही. यादीतील ७०० मतदारांच्या नावात घोळ आहे. अनेकांची नावे व वय चुकीचे आहे. मात्र, आता त्यात काहीच बदल करता येणार नाही, असे सांगून सरकारी यंत्रणेकडून हात वर केले जात आहेत. मतदानावेळी यंत्रणेने हरकत घेतल्यास मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. तसेच चुकीच्या नावांचा फटकाही उमेदवारांना बसू शकतो. ७०० मते सगळ्याच उमेदवारांसाठी निर्णायक ठरू शकतात.किसन कथोरे, नरेंद्र पवारांकडून प्रचारबाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती नाही. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादी व मनसेच्या उमेदवारांचा प्रचार केला. समितीवर भाजपाच्या जास्तीतजास्त जागा आणण्यासाठी भाजपा आमदार किसन कथोरे व नरेंद्र पवार यांनी प्रचारावर अधिक भर दिला आहे.ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. ती पॅनल पद्धतीने होत असून प्रत्येक उमेदवाराला निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवार नेमक्या कोणत्या पक्षाचा आहे, हे स्षष्ट होत नाही. मात्र, पॅनल पद्धतीत कोण कोणाचा प्रचार करतो, यावरून त्या उमेदवाराच्या विजयासाठी कोण मेहनत घेत आहे, हे उघड होते.बाजार समितीवर यापूर्वी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. ते मोडीत काढत कथोरे यांनी भाजपाचा झेंडा फडकावला होता. तोच झेंडा पुन्हा फडकावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाने राष्ट्रवादीशी छुपी युती केल्याने उमेदवार निवडून आल्यावर कोणत्या पक्षाचा सदस्य सभापतीपदी विराजमान होईल, हे अद्याप स्पष्ट नाही.

टॅग्स :kalyanकल्याणAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेBJPभाजपा