शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सखींनी ठाण्यात लुटला बहारदार सखीमेळ्याचा आनंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:41 AM

गौरव महाराष्ट्राचा नृत्याविष्कार, रॅम्पवॉक- उखाणे स्पर्धा, घरगुती वापरायोग्य वस्तूंचे अनेक स्टॉल्स, ‘राधा प्रेम रंगी रंगली’-फेम राधा अर्थात अभिनेत्री वीणा जगताप हिच्या गप्पांचा कार्यक्रम आणि कॉमेडी क्वीन तृप्ती खामकरची तुफान कॉमेडी अशा अनेकविध सत्रांनी शुक्रवारी ठाण्यात रंगलेल्या ‘रुणवाल प्रस्तुत लोकमत सखीमेळ्या’चा सखींनी आनंद लुटला.

ठाणे - गौरव महाराष्ट्राचा नृत्याविष्कार, रॅम्पवॉक- उखाणे स्पर्धा, घरगुती वापरायोग्य वस्तूंचे अनेक स्टॉल्स, ‘राधा प्रेम रंगी रंगली’-फेम राधा अर्थात अभिनेत्री वीणा जगताप हिच्या गप्पांचा कार्यक्रम आणि कॉमेडी क्वीन तृप्ती खामकरची तुफान कॉमेडी अशा अनेकविध सत्रांनी शुक्रवारी ठाण्यात रंगलेल्या ‘रुणवाल प्रस्तुत लोकमत सखीमेळ्या’चा सखींनी आनंद लुटला. हा कार्यक्रम क्लब सेरेना, रुणवाल गार्डन सिटी, बाळकुम, ठाणे येथे रंगला.नृत्याविष्कारातून गणरायाला वंदन करून या मेळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर, रुणवाल ग्रुपच्या उपाध्यक्षा मनीषा देशपांडे यांचा लोकमतच्या ब्रॅण्ड आणि कम्युनिकेशन उपाध्यक्षा शालिनी गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर, रुणवाल ग्रुपच्या एजीएम नेहल वोरा यांचा लोकमत ठाणेचे एजीएम राघवेंद्र शेट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रुणवालच्या ठाणे टीमच्या सिनिअर मॅनेजर हेमलता घोप यांनी रुणवाल ग्रुपचे विविध प्रोजेक्ट, त्याअंतर्गत असणाऱ्या सोयीसुविधा यांची माहिती सखींना दिली. त्यानंतर, अभिनेत्री वीणा जगताप ऊर्फ राधाशी गप्पांचा कार्यक्रम रंगला. महाविद्यालयात असताना मला मॉडेलिंग, अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर मी काही काळ कॉर्पोरेट नोकरीही करत होते. मात्र, नोकरी सोडल्यावर मला माझ्या एका मित्राने ‘राधा’च्या भूमिकेसाठी आॅडिशन देण्याचे सुचवले. मी त्यासाठी जवळपास २५ वेळा व्हिडीओ शूट केला. मात्र, चांगला शूट होत नव्हता. कंटाळून शेवटचा प्रयत्न म्हणून २६ व्या वेळा व्हिडीओ शूट केला आणि त्याच व्हिडीओद्वारे मी शॉर्ट लिस्टेड झाले. नंतर, पुन्हा आॅडिशनद्वारे माझी या भूमिकेसाठी निवड झाली. त्यामुळे माणसाने कधीही हार मानायची नसते, असे वीणा म्हणाली. तर, राधाची भूमिका खूप चॅलेंजिंग आहे. त्या व्यक्तिरेखेमध्ये आणि माझ्या मूळ स्वभावात खूप फरक आहे. राधा या व्यक्तिरेखेतील संयम बाळगणे हा चांगला गुण माझ्या अंगी उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, अनेकदा शूटिंगदरम्यानही परफेक्ट सीन येईपर्यंत खूप संयम राखावा लागतो, असेही राधाने सांगितले.वन मिनिट गेम शो अंतर्गत काही सखींसह राधानेही मराठी गाण्यांच्या ठेक्यावर रॅम्प वॉक केला. यातून उत्कृष्ट रॅम्प वॉकसाठी सुलभा देशपांडे यांना फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर, झालेल्या उखाणे स्पर्धेतही सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. उखाणे स्पर्धेत मीनाक्षी मोहोड यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ती तृप्ती खामकर हिची स्टॅण्डअप कॉमेडी. लग्नासाठी मुलगा निवडताना येणारे अनुभव, प्रसंग आणि त्यातून निर्माण होणारा विनोद सांगत तृप्तीने सखींना पोटभर हसवले.महिलांवरील अत्याचाराचा निषेध म्हणून पाळले मौनगेल्या आठवडाभरात महिलांवर झालेल्या अन्यायांचा निषेध म्हणून उपस्थित सखींनी मिनिटभर मौन पाळले. महाराष्टÑाचे वैविध्य दाखवणाºया विविध गीतांवरील गौरव महाराष्टÑाचा नृत्याविष्कार, वर्षा दर्पे यांनी सादर केलेल्या सदाबहार गीतांवरील लावण्या याने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. आधार इंडिया या स्वयंसेवी संस्थेने विविध स्टॉल्स लावले होते. स्वप्नील जाधव यांनी खुमासदार शैलीत निवेदन केले.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या