कंगणा राणावत यांच्या पोस्टरला भिवंडीत राष्ट्रवादी महिलांचे जोडो मारो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 18:15 IST2021-11-17T18:14:44+5:302021-11-17T18:15:03+5:30
Kangana Ranaut News: भिवंडीत बुधवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यानी कंगणा राणावत हिच्या पोस्टरला जोडो मारीत पोस्टर पायदळी तुडवून आपला संताप व्यक्त केला आहे.

कंगणा राणावत यांच्या पोस्टरला भिवंडीत राष्ट्रवादी महिलांचे जोडो मारो आंदोलन
- नितिन पंडीत
भिवंडी - बेताल वक्तव्याने नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा राणावत हिने मागील आठवड्यात एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत १९४७ मध्ये मिळालेले स्वतंत्र हे भीक असून खरे स्वतंत्र २०१४ मध्ये मिळाले असे वक्तव्य केल्याने संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या बाबत वादग्रस्त विधान केले असून त्यामुळे कंगणा राणावत पुन्हा एकदा टीकेची धनी झाली असून भिवंडीत बुधवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यानी कंगणा राणावत हिच्या पोस्टरला जोडो मारीत पोस्टर पायदळी तुडवून आपला संताप व्यक्त केला आहे.