शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

दोस्ती रेंटलच्या संक्रमण शिबिरात आढळले भलतेच भाडेकरू, पालिका प्रशासनाने केलेल्या तपासणीत उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 9:33 PM

रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती तसेच महापालिकेच्या विविध योजनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना निवासासाठी असलेल्या दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये भलतेच पोटभाडेकरू आढळल्याने एकच खळबळ उडाली.

 ठाणे - रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती तसेच महापालिकेच्या विविध योजनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना निवासासाठी असलेल्या दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये भलतेच पोटभाडेकरू आढळल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्तनगर परिसरामध्ये ठाणे महापालिकेने उभारलेल्या दोस्ती संक्र मण शिबिरांमध्ये लाभार्थींऐवजी त्यांनी ठेवलेल्या पोट भाडेकरूंकडून सदनिकांचे वापर होत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या होत्या. पालिकेचे उपअभियंता याबाबतची उपअभियंता प्रदीप घाडगे, दोस्ती रेंटल हाऊसिंगचे व्यवस्थापक रत्नाकर सातपुते आणि दर्शना सावरकर यांच्या पथकाने अचानकपणे २१ आॅगस्ट रोजी धाड टाकून तपासणी केली होती. याच तपासणीमध्ये लाभार्थींनी पोट भाडेकरू ठेवून त्यांच्याकडून दुप्पट भाडे आकारणी करून सदनिका दिल्याचे उघडकीस आले.याप्रकरणी लाभार्थी तबसुम जबार, मुरतुजा जबार, एम.डी. मुबीन, सुलताना मुबीन, शाहिन कुरेशी तसेच जिहंद कुरेशी यांच्या घरांमध्ये अनुक्र मे जगदीश जुदिकया, नंदा ठाकूर आणि प्राची खाडे वास्तव्य करीत असल्याचे आढळले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाण्यातील रस्ता रु ंदीकरण आणि अन्य विकास प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना संक्र मण शिबीरांमध्ये धाडण्यात आले आहे. वर्तकनगर परिसरामध्ये दोस्ती संक्र मण शिबीर असून तेथे महापालिकेने अनेकांना सदनीका उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन हजार रु पयांच्या शुल्कावर या सदनिका देण्यात आल्या असून संक्र मण शिबीर म्हणून या भागात सदनिका दिल्या जातात. काही सदनिकांमध्ये लाभार्थींनी स्वत: ऐवजी पोट भाडेकरून ठेवल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार मालमत्ता विभागातील उप अभियंता प्रदीप घाडगे यांनी धाड टाकल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या पोटभाडेकरूंकडून ४ ते ५ हजारांचे भाडे घेतले जात होते. महापालिकेच्या परवानगीशिवाय ही सदनिका परस्पर भलत्याच व्यक्तीला देऊन महापालिकेचा विश्वासघात केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेCrimeगुन्हा