पक्षनिष्ठेला प्राधान्य : काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:10 AM2019-08-01T01:10:23+5:302019-08-01T01:10:37+5:30

पक्षनिष्ठेला प्राधान्य : शहरातील चार मतदारसंघांसाठी २४ जण रांगेत

Interviews of aspirants in Congress | पक्षनिष्ठेला प्राधान्य : काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती

पक्षनिष्ठेला प्राधान्य : काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती

googlenewsNext

ठाणे : ठाणे जिल्ह्यात आणि शहरात काँग्रेस पक्ष संपला, असे म्हटले जात असताना ठाणे शहरातील विधानसभेच्या चारही मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी पार पडल्या. इच्छुकांच्या रांगेत असलेल्या २४ पैकी दोन जण वैयक्तिक कारणास्तव बुधवारी मुलाखतीला उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी इच्छुक उमेदवार हा काँग्रेसमध्ये कधीपासून आहे. तसेच इतर इच्छुकांपैकी एकाचे नाव सुचवण्याबाबतही मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कल्याण मतदारसंघापाठोपाठ बुधवारी ठाण्यातील चार विधानसभांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ठाण्यातील एका हॉटेलमध्ये मुलाखतीसाठी बोलवले होते. या मुलाखती जिल्हा निवड मंडळाचे निरीक्षक माजी मंत्री सुरेश शेट्टी व प्रदेश सरचिटणीस राजाराम पानगवाणे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे, के. वृषाली, सुमन अग्रवाल यांच्यासह शहराध्यक्ष मनोज शिंदे, नगरसेवक विक्रांत चव्हाण हेही हजर होते.
मुलाखतीला इच्छुकांना विविध प्रश्नांबाबत विचारण्यात आले. त्यातच, पक्षाचे निष्ठावान म्हणून आपण इतर इच्छुकांमध्ये कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, असे वाटते. त्याचे नाव सुचवा, असेही काही प्रश्न विचारून त्यांना पेचात टाकण्याचा प्रयत्न झाला. कोपरी-पाचपाखाडी व ठाणे शहरातून इच्छुकांची संख्या जास्त होती. तसेच पक्षाशी निष्ठावान व जुनेजाणते मोजता येतील, इतकेच असल्याचे दिसले.

भाजपला हवी कल्याण ग्रामीणची जागा : कार्यकर्त्यांची सीएमकडे मागणी

च्कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा भाजपसाठी अनुकू ल आहे. सोमवारी डोंबिवलीत एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन २०१४ साली या मतदारसंघातून भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने अनेक मतदारांनी नोटा वापरल्याचे म्हटले आहे.

च्२००९ साली कल्याण ग्रामीण हा नव्याने विधानसभा मतदारसंघ तयार झाला. येथे तिसऱ्यांदा निवडणूक होणार आहे. सध्या या मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे सुभाष भोईर आहेत. युती झाली, तर ते येथील पहिले दावेदार ठरतील, असे बोलले जात आहे.

च्आता येथील भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा राज्यात मजबूत सरकार स्थापन करणार, यात शंका नाही. २०१४ साली येथे आपल्या उमेदवाराने माघार घेतल्याने नाराज असणाºया अनेक मतदारांनी सर्वाधिक नोटा हा पर्याय वापरला.

च्भाजप कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली आहे. युतीच्या चर्चेत हा मतदारसंघ भाजपसाठी मागून घ्या, येथे पक्षाचा उमेदवार सहज निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे आ. भोईर यांचे टेन्शन वाढले आहे.

काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती. लवकरच यातून निवडक जणांच्या नावांची यादी तयार करून ती प्रदेशला कळवली जाईल आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर केली जाईल.
- मनोज शिंदे,
शहराध्यक्ष, ठाणे काँग्रेस
 

Web Title: Interviews of aspirants in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.