शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

International Yoga Day 2018 : योगासनांमुळे करता येते असाध्य आजारांवरही मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:38 AM

योगासनांचे अनेक फायदे आहेत. नियमितपणे योगासने केल्यास आरोग्य उत्तम राहते; पण रुग्णांनी योगासने केल्यास असाध्य आजार बरे होऊ शकतात आणि शस्त्रक्रियाही टळू शकते हे कल्याणमधील योगासनांच्या प्रशिक्षक श्रुती वैद्य यांनी दाखवून दिले आहे.

- जान्हवी मोर्ये कल्याण : योगासनांचे अनेक फायदे आहेत. नियमितपणे योगासने केल्यास आरोग्य उत्तम राहते; पण रुग्णांनी योगासने केल्यास असाध्य आजार बरे होऊ शकतात आणि शस्त्रक्रियाही टळू शकते हे कल्याणमधील योगासनांच्या प्रशिक्षक श्रुती वैद्य यांनी दाखवून दिले आहे.शहरातील म्हसोबा मैदान येथे राहणाऱ्या वैद्य यांच्या आई शैलजा देव या योगासनांच्या प्रशिक्षक होत्या. वैद्य यांनी त्यांच्याकडूनच त्याचे धडे गिरवले. त्या वयाच्या दहाव्या वर्षांपासून योगासने करत आहेत, तर २० वर्षांपासून इतरांना प्रशिक्षण देत आहेत. आईकडून योगासनांचे प्रशिक्षण घेतले असले तरी त्यांनी ‘अंबिका कुटीर योग’ येथून बेसिक प्रशिक्षण घेतले आहे. ‘फूड सायन्स अँड न्यूट्रिशन’ यात त्यांनी पदवी, तर ‘स्पोर्ट्स सायन्स अँड न्यूट्रिशन’ यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे, त्यामुळे त्या रुग्णालयातील गर्भवती मातांना योगासने आणि डाएट यांचे मार्गदर्शन करतात.योगासनांचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे आलेल्या एका व्यक्तीचे खांदे आखडलेले होते, त्यामुळे त्यांचे हात वर जात नव्हते, तसेच कोणतेही काम त्यांना करता येत नव्हते. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला, पण त्यांनी त्याऐवजी योगासनांचा मार्ग अवलंबिला. सहा महिने योगासने केल्यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. अशा रुग्णांना फक्त थेराप्युटीक योगा द्यावा लागतो, असे वैद्य सांगतात. तर दुसºया एका केसमध्ये पार्किन्सनच्या रुग्णाला दिलासा मिळाला. पार्किन्सन हा मेंदूशी संबंधित आजार आहे. त्यात हातपाय थरथरतात. माणसाची अधोगती होते. औषधांचा साइड इफेक्टही होतात, अशा रुग्णाला योगासनांचा फायदा झाला. मागील १४ वर्षांपासून ते चांगले जीवन जगत आहेत. या रुग्णावर उपचार करणाºया न्यूरोसर्जनने चमत्कार घडवल्याची पावती वैद्य यांना दिली. एकदा त्या रुग्णाला व्हेटिलेंटरवर ठेवले होते. त्या वेळी त्यांनी योगासने करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले होते. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ होती. सध्या ती व्यक्ती अमेरिकत पर्यटनासाठी गेली आहे. योगासनांमुळे त्याही बºया झाल्याचे वैद्य यांनी सांगितले.>योगासनांसाठीवयाचे बंधन नाहीवैद्य यांच्याकडे आठ वर्षांच्या मुलांपासून ७७ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठापर्यंत सर्व जण योगासनांचे धडे गिरवत आहेत. महिला नोकरी आणि घर सांभाळूनही सायंकाळी ७ ते ८ या वेळेत योगासनांच्या वर्गाला हजेरी लावतात. २५ ते ३० जणांच्या ग्रुपला त्या एका वेळी प्रशिक्षण देतात. प्रत्येक जण स्वत:साठी योगासने करत असतो. मला योगासनांचा कंटाळा कधी आल्याचे आठवणीत नाही, असे ही त्यांनी सांगितले.>नेत्रहिनांसाठी योग शिबिरजागतिक योग दिनाचे औचित्य साधून सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाउंडेशनने ‘श्रीमती कमला मेहता दादर स्कूल फॉर ब्लाइंड’ येथील दृष्टीहीन विद्यार्थिनींसाठी एकदिवसीय विनाशुल्क योग शिबिराचे आयोजन नुकतेच केले होते.>कॉर्पोरेट्समध्ये ‘डेस्कटॉप योगा’मुंबईतील कॉर्पोरेट्समध्येही योग दिनाच्या पूर्वसंध्येला कर्मचारी आणि अधिकारी योगा करताना दिसले. ‘डेस्कटॉप योगा’ ही नवी संकल्पना या वेळी भलतीच भाव खाऊन गेली. रमेश संघवी यांनी कर्मचारी आणि अधिकाºयांना योगाचे प्रशिक्षण दिले.

टॅग्स :Yogaयोग