अंबरनाथ तालुक्यासाठी बदलापुरात स्वतंत्र कोरोना टेस्टिंग लॅब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 17:23 IST2020-07-18T17:21:19+5:302020-07-18T17:23:01+5:30
बदलापूर पालिका, अंबरनाथ पालिका यांच्यासह ग्रामीण भागातील रुग्णांची चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र चाचणी याची मागणी केली होती.

अंबरनाथ तालुक्यासाठी बदलापुरात स्वतंत्र कोरोना टेस्टिंग लॅब
बदलापूर - अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर पालिका अंबरनाथ पालिका आणि ग्रामीण भागातील कोरोना ग्रस्तांची चाचणी केल्यानंतर त्या चाचणीचा अहवाल येण्यासाठी तीन दिवस लागत असल्याने रुग्णांच्या चिंतेत वाढ होत होती. त्यामुळे अंबरनाथ तालुक्यासाठी स्वतंत्र कोरोना चाचणी कक्ष सुरू करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार बदलापूरतील पालिकेच्या विरंगुळा केंद्रात कोरोनाची चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बदलापूर पालिका, अंबरनाथ पालिका यांच्यासह ग्रामीण भागातील रुग्णांची चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र चाचणी याची मागणी केली होती. त्यानुसार तालुक्याच्या ठिकाणी प्रशस्त जागेत ही लॅब सुरू करण्यात येणार होती. सुरुवातीला ही लॅब तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्याचा विचार होता. मात्र बदलापूर पालिकेने मांजर्ली परिसरातील एका विरंगुळा केंद्रात या लॅबसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी शासनाने नेमलेल्या संस्थेमार्फत कोरोना चाचणी लॅब सुरू करण्यात येत आहे. या लॅबचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच त्या ठिकाणी सेवा देखील सुरू होणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी जगतसिंग केल्याचे यांनी स्पष्ट केले आहे. ''या लॅबचा फायदा अंबरनाथ, बदलापूर आणि तालुक्यातील ग्रामीण भागाला होणार आहे. तसेच याला मधील अहवाल देखील 24 तासाच्या आत मिळण्यास मदत होणार आहे.