उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणारे दोघे जण गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 04:06 IST2022-05-30T04:06:13+5:302022-05-30T04:06:19+5:30

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी जेरबंद केलेले दोन्ही चोरटे सराईत असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले.

In Ulhasnagar, two people who were robbing at gunpoint are arrested | उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणारे दोघे जण गजाआड

उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणारे दोघे जण गजाआड

 

उल्हासनगर : कॅम्प नं-१ मधूबन चौकात पिकअप गाडी चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन चोरट्यानाउल्हासनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही चोरीची असल्याची उघड झाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-१ गुरुद्वार मार्गे मधूबन चौककडे जियारुल अन्सार शेख हें मंगळवारी २४ मे रोजी पहाटे ४ वाजता पिकअप गाडी घेऊन जात होते. त्यावेळी ओव्हरटेक करून जाणारा रिक्षा पिकअप गाडी समोर आडवी उभी केली. यामधून उतरलेल्या दोन तरुणांनी जियारुल यांच्या गळ्याला चाकू लावून रोख रक्कम ८ हजार, एक मोबाईल, आधारकार्ड व पॅनकार्ड घेऊन पोबारा केला. याप्रकरणी २५ मे रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी पोलीस सूत्र हलवून दोन्ही चोरट्याला शनिवारी जेरबंद केले. त्यांनी वापरलेली रिक्षा चोरीची असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख दोन हजार, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी जेरबंद केलेले दोन्ही चोरटे सराईत असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले. त्यांची नावे प्रेम विरसिंग चिरोलिया व कृष्णा अन्सार शेख अशी आहे. त्यांनी यापूर्वी गुन्हे केले आहेत का. याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम करीत आहेत.

Web Title: In Ulhasnagar, two people who were robbing at gunpoint are arrested