उल्हासनगरात पवई चौक रस्ता रुंदीकरणात १० ते १२ घरावर तोडून कारवाई

By सदानंद नाईक | Published: March 6, 2024 05:47 PM2024-03-06T17:47:47+5:302024-03-06T17:48:05+5:30

उल्हासनगरात १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याची पुनर्बांधणी केली जात आहे. कॅम्प नं-३ येथील पवई चौक ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान ६० फुटी रस्त्याची पुनर्बांधणी सुरू आहे.

In Ulhasnagar, Powai Chowk road widening action by demolishing 10 to 12 houses | उल्हासनगरात पवई चौक रस्ता रुंदीकरणात १० ते १२ घरावर तोडून कारवाई

उल्हासनगरात पवई चौक रस्ता रुंदीकरणात १० ते १२ घरावर तोडून कारवाई

उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील पवई चौक ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रस्त्याचे रुंदीकरण करून पुनर्बांधणी केली जात आहे. रस्त्याच्या आड येणाऱ्या १० ते १२ घरावर अतिक्रमण विभागाच्या पथकाने केल्याची माहिती विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली. कारवाई वेळी नागरीक व पथकाच्या कर्मचाऱ्यांत तू तू मैं मैं झाली आहे.

उल्हासनगरात १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याची पुनर्बांधणी केली जात आहे. कॅम्प नं-३ येथील पवई चौक ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान ६० फुटी रस्त्याची पुनर्बांधणी सुरू आहे. यावेळी पवई चौक परिसरात रस्त्याच्या आड येणाऱ्या १० ते १२ घरावर बुधवारी दुपारी महापालिका अतिक्रमण पथकाने तोडक कारवाई केली. कारवाई वेळी स्थानिक नागरिक व महापालिका पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या शिवीगाळ व तू तू मैं मैं झाल्याचा प्रकार झाला. मुख्य ७ रस्त्याच्या पुनर्बांधणी वेळी रस्त्याच्या आड येणाऱ्या १५० पेक्षा जास्त घरांना महापालिकेने यापूर्वीच नोटिसा बजाविल्या असून टप्प्याटप्प्याने त्या बांधकामावर पाडकाम कारवाई करण्याचे संकेत नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली आहे. 

शहरातील नेताजी चौक ते कैलास कॉलनी या मुख्य रस्त्याची बांधणी सुरू झाली असून नेताजी चौक ते भाटीया चौक दरम्यान मधील ५४ दुकांनाना पालिकेने नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसा विरोधात स्थानिक व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या सोबत चर्चा केली. महापालिकेची तोडून कारवाई थांबली असून भविष्याचा विचार करता मुख्य ७ रस्त्याची बांधणी शहर विकास आराखड्यानुसार करावी. अशी मागणी सिहनिक नागरिका कडून दिली आहे.

Web Title: In Ulhasnagar, Powai Chowk road widening action by demolishing 10 to 12 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.