भिवंडीत मांजा ने घेतला दुचाकी चालकाचा बळी

By नितीन पंडित | Updated: January 15, 2023 23:16 IST2023-01-15T23:15:43+5:302023-01-15T23:16:42+5:30

संजय कबीर हजारे वय ४७ रा. उल्हासनगर ३ असे बळी गेलेल्या निष्पाप व्यक्तीचे नाव आहे. ही घटना उड्डाणपुलावर नवीबस्ती परिसरात घडली...

In Bhiwandi, Manja took the victim of a two-wheeler driver | भिवंडीत मांजा ने घेतला दुचाकी चालकाचा बळी

भिवंडीत मांजा ने घेतला दुचाकी चालकाचा बळी

भिवंडी : नायलॉनच्या मांजावर महाराष्ट्रात बंदी असतानाही त्याचा सर्रास वापर पतंग उडवताना केला जात आहे.अशाच एका पतंगाच्या नायलॉन मांजाने भिवंडी शहरातील कल्याण नाका येथील स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून दुचाकी वरून जाणाऱ्या व्यक्तीचा बळी घेतला आहे. 

संजय कबीर हजारे वय ४७ रा. उल्हासनगर ३ असे बळी गेलेल्या निष्पाप व्यक्तीचे नाव आहे. ही घटना उड्डाणपुलावर नवीबस्ती परिसरात घडली असून शहर पोलीस ठाण्यात या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: In Bhiwandi, Manja took the victim of a two-wheeler driver