बदलापुरात भावजीने केली मेहुणीची हत्या, सासूलाही बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 10:20 IST2022-11-29T10:20:37+5:302022-11-29T10:20:56+5:30

पत्नी, सासूलाही केली बेदम मारहाण

In Badlapur, brother-in-law killed sister-in-law, mother-in-law was also brutally beaten | बदलापुरात भावजीने केली मेहुणीची हत्या, सासूलाही बेदम मारहाण

बदलापुरात भावजीने केली मेहुणीची हत्या, सासूलाही बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : मालमत्तेच्या वादातून झालेले पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेहुणीची भावजीने हत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये सोमवारी घडली. यात आरोपीने पत्नी आणि सासूवरही हल्ला करून त्यांना जखमी केले. बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूर गावातील सनसेट हाईट इमारतीत फरिदा सय्यद या त्यांच्या दोन मुली निलोफर आणि सनोबर, तसेच नातवंडांसोबत राहतात. त्यांची मुलगी निलोफर ही विवाहित असून पतीसोबत वाद सुरू असल्याने ती आईकडेच वास्तव्याला आहे. सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निलोफरचा पती मोहम्मद आयुब शेख हा सासूच्या घरी राहणाऱ्या आपल्या पत्नीला भेटायला आला. मात्र दरवाजा उघडताच त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने निलोफरवर हल्ला चढवला. या हल्ल्यात निलोफर गंभीर जखमी झाली. हे पाहून त्याची मेहुणी सनोबर आणि तिची आई फरिदा या दोघी  निलोफरला वाचवायला मध्ये पडल्या. मात्र मोहम्मदने त्या दोघींवरही हल्ला चढवला. यामध्ये सनोबरचा जागीच मृत्यू झाला, तर फरिदा सय्यद जखमी झाल्या. यावेळी स्थानिकांनी मोहम्मद आयुब शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या हल्ल्यात जखमी झालेल्या निलोफर आणि फरिदा सय्यद यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मालमत्तेवरून होता दोघांमध्ये वाद
मोहम्मद शेख हा दुबईला कामाला होता. पत्नी निलोफर सोबत त्याचे पटत नसल्यामुळे ते दोघे वेगळे राहत होते. मात्र जोगेश्वरीच्या प्रॉपर्टीवरून या दोघांमध्ये वाद होते. 
याच वादातून ही हत्या झाल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली. आरोपी मोहम्मद आयुब शेख याला पोलिसांनी अटक केली.

Web Title: In Badlapur, brother-in-law killed sister-in-law, mother-in-law was also brutally beaten