कुजबुज! ‘मी येतोच, तुम्ही थांबा'; खा.श्रीकांत शिंदेंच्या भेटीसाठी आमदार ५ तास ताटकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 07:02 IST2022-12-09T07:01:55+5:302022-12-09T07:02:30+5:30
आयलानी यांनी यादरम्यान अनेकदा ‘खासदार साहेबांना’ फोन केला. तेव्हा ‘मी येतोच, तुम्ही थांबा,’ असा निरोप खासदारांच्या कार्यालयातून मिळत होता.

कुजबुज! ‘मी येतोच, तुम्ही थांबा'; खा.श्रीकांत शिंदेंच्या भेटीसाठी आमदार ५ तास ताटकळले
उल्हासनगर - गेल्या आठवड्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरच्या गोलमैदान येथील संपर्क कार्यालयाला धावती भेट दिली. खा. शिंदे येणार असल्याने भाजपचे आ. कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर खासदारांनी मीच आयलानी यांच्या कार्यालयात येतो, असा निरोप भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. संध्याकाळी सहापासून रात्री ११ पर्यंत आयलानी यांच्यासह अन्य अनेकजण खा. शिंदे यांच्या भेटीसाठी ताटकळले.
आयलानी यांनी यादरम्यान अनेकदा ‘खासदार साहेबांना’ फोन केला. तेव्हा ‘मी येतोच, तुम्ही थांबा,’ असा निरोप खासदारांच्या कार्यालयातून मिळत होता. अखेर वाट बघून थकलेले आमदार, भाजप पदाधिकारी आपापल्या घरी निघून गेले. आमदारांनी खासदारांनी ताटकळत ठेवल्याची कुजबुज सुरू झाल्याने कार्यबाहुल्यामुळे खासदार येऊ शकले नाहीत, अशी सावरासावर आयलानी यांनी सुरू केली आहे.