350 रुपये मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पत्नीच्या चेह-यावर फेकलं उकळतं तेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 13:38 IST2017-12-09T13:26:03+5:302017-12-09T13:38:40+5:30

350 रुपये मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीच्या चेह-यावर उकळतं तेल फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

husband throws hot oil on wife face after demanding 350 rupees | 350 रुपये मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पत्नीच्या चेह-यावर फेकलं उकळतं तेल

350 रुपये मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पत्नीच्या चेह-यावर फेकलं उकळतं तेल

ठळक मुद्दे350 रुपये मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीच्या चेह-यावर उकळतं तेल फेकलंमहिलेला उपचारासाठी इंदिरा गांधी मेमोरिअल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

भिवंडी - 350 रुपये मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीच्या चेह-यावर उकळतं तेल फेकल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी इंदिरा गांधी मेमोरिअल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यमुना गायकवाड असं या महिलेचं नाव आहे. महिलेचा पती ऑटो रिक्षाचालक आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा चालक असलेला विठ्ठल गायकवाड आपल्या मित्रासोबत घरी आला होता. भिवंडीतील नागाव-गायत्रीनगर येथे त्यांचं घर आहे. यावेळी त्याची पत्नी यमुना गायकवाड यांनी त्याच्या मित्रासमोर शिलाईसाठी 350 रुपये मागितले. यामुळे विठ्ठल गायकवाड नाराज झाला. 

मित्रासमोर पैसे मागितल्याने चिडलेल्या विठ्ठल गायकवाडने स्टोव्हवर स्वयंपाक करत असलेल्या यमुना गायकवाड यांच्यावर उकळते तेल फेकले. उकळतं तेल फेकल्याने यमुना गायकवाड गंभीर भाजल्या असून त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी मेमोरिअल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी विठ्ठल गायकवाडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: husband throws hot oil on wife face after demanding 350 rupees