शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्याचा महाड तालुक्याला फटका

By admin | Updated: October 3, 2015 23:31 IST

विजांच्या कडकडाटांसह शुक्रवारी पडलेल्या वादळी पावसाचा फटका महाड तालुक्यातील वाळण बुद्रुक, वाळण खुर्द, वहूर या गावासह अनेक ठिकाणी बसला.

महाड : विजांच्या कडकडाटांसह शुक्रवारी पडलेल्या वादळी पावसाचा फटका महाड तालुक्यातील वाळण बुद्रुक, वाळण खुर्द, वहूर या गावासह अनेक ठिकाणी बसला. वाळण येथील सुमारे पन्नास घरांसह अनेक गुरांच्या गोठ्यांचीदेखील यात मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे वृत्त आहे. महसूल विभागामार्फत केलेल्या पंचनाम्यानुसार अंदाजे चार लाखांपेक्षाही अधिक नुकसान झाल्याची महसूल विभागामार्फत माहिती देण्यात आली आहे. महामार्गावरील वहूर येथेही काही घरांचे या वादळी पावसात नुकसान झाले आहे.शुक्रवारी दुपारनंतर सुरू झालेल्या या वादळी पावसात वाळण येथील दयाराम कालगुडे, चंद्रकांत कालगुडे, संजय सुतार, भालचंद्र वखाटकर, शकुंतली पोटे, महेंद्र कालगुडे आदी पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या घरांचे तसेच गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले.या वादळात वाळण बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा तसेच बुद्धविहाराच्या इमारतीवरील छप्परांचे नुकसान झाले असून संपूर्ण इमारतीत मुसळधार पावसाचे पाणी साचून राहिले आहे. झालेल्या नुकसानीचे महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करण्यात येत आहेत. महाड औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांच्या छप्परांचेही या वादळात नुकसान झाले आहेत. (प्रतिनिधी)