लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 08:52 IST2025-10-14T08:45:41+5:302025-10-14T08:52:58+5:30
लोकलसेवा आज उशिराने धावत असल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.

लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
बदलापूर : सकाळच्या सत्रात लोकल उशिराने धावत असल्यामुळे बदलापूरच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. बदलापूर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून लोकल पकडताना मोठी कसरत करावी लागत आहे.
लोकलसेवा आज उशिराने धावत असल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. लोकल पकडणे देखील बदलापूरकरांना अवघड जात आहे. आज पुन्हा लोकल प्रवाशांनी बदलापूर स्थानकात रेल्वे सुरक्षा बला सोबत वाद घालत आपला संताप व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी देखील कर्जत लोकल वरून प्रवाशांनी रेल्वे स्टेशन प्रबंधकच्या कार्यालयाला घेराव घ्यायला होता.
आज पुन्हा लोकल सेवा उशिराने धावत असल्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. सानकात उभे राहण्यासाठी देखील प्रवाशांना जागा शिल्लक राहिली नव्हती. लोकल सेवेच्या अनियमिततेमुळे बदलापूरकर संतप्त झाले आहेत.
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी;
— Lokmat (@lokmat) October 14, 2025
गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात pic.twitter.com/D7ZNItqV9R