शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमधील पोल्ट्रीत बिबट्याने पाडला कोंबड्यांचा फडशा

By admin | Updated: February 5, 2016 02:36 IST

विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे गावात आज पहाटे बिबटयाने येथील प्रकाश केणी यांच्या वाडीत असलेल्या पोल्ट्रीमधील गावठी कोंबडयांवर ताव मारून ५२ कोंबडया ठार केल्या

राहुल वाडेकर,  तलवाडाविक्रमगड तालुक्यातील कुंर्झे गावात आज पहाटे बिबटयाने येथील प्रकाश केणी यांच्या वाडीत असलेल्या पोल्ट्रीमधील गावठी कोंबडयांवर ताव मारून ५२ कोंबडया ठार केल्या. त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यानच्या काळात वन विभागास पाचारण करण्यात आले होते, मात्र बिबटया पसार झाल्याने त्यास पकडण्यात वनविभागास अपयश आले आहे़ १कुंर्झे गावामध्ये आसपास जंगल असल्याने त्यातून गावामध्ये बिबटया येण्याची ही पहिलीच घटना आहे़ प्रथम त्यास चौधरी यांनी पाहीले त्यांनी गावातील लोकांना याबाबत सांगितले. बिबटया हा वाडीमध्ये कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी आला असावा, अंंदाज आहे़ मात्र त्याने अनेक कोंबडया का मारुन टाकल्यात? हा प्रश्न आहे. २या कोंबडया गावरान असल्याने त्याचा दर बाजारात ३५०/-रुपये आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या दरम्यान बिबटया वाडीमध्ये फिरत असतांना वनविभागास पाचारण करण्यात आले होते़ परंतु ते येईपर्यंत तो पळून गेल्याने, तो नक्की कोणत्या भागात आहे व तो कोणत्या भागातुन आला असावा याचा नक्की अंदाज बांधता आला नाही़ यापूर्वी असा प्रकार कधी घडल्याचे एैकीवात नाही़ ३दरम्यानच्या काळात बिबटयाच्या या आगमानाने गावातील लोक मात्र भयभीत झाले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्या हा शेड्युल ए चा प्राणी असल्याने त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यासाठीही वन्यजीव संरक्षकांची परवानगी आवश्यक असते. ती मिळाल्यानंतरच त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे वनखात्याच्या सूत्रांनी सांगितले.