9 वर्षाच्या चिमुरडीवर त्यानं केला अत्याचार, उल्हासनगरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 14:04 IST2017-09-28T14:03:59+5:302017-09-28T14:04:24+5:30
शहरातील शांतीनगर येथे राहणारी 9 वर्षाची चिमुरडी खेळत होती. शेजारी राहणारा रुपेश याने मुलीला नाटक बघण्याच्या बहाण्याने घरात बोलावून अत्याचार केला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

9 वर्षाच्या चिमुरडीवर त्यानं केला अत्याचार, उल्हासनगरातील घटना
उल्हासनगर : शहरातील शांतीनगर येथे राहणारी 9 वर्षाची चिमुरडी खेळत होती. शेजारी राहणारा रुपेश याने मुलीला नाटक बघण्याच्या बहाण्याने घरात बोलावून अत्याचार केला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-3, शांतीनगर केणी चाळीत चिमुरडी कुटुंबासह राहते. आई घरकाम तर वडील हाताला मिळेल ते काम करतात. रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान मुलगी घरासमोर खेळत होती. तेंव्हा तिच्यावर शेजारी राहनारा रुपेश बाद्रे याची नजर पडली. त्याने मुलीला नाटक बघण्याचे आमिष दाखवून घरात बोलावून अंगावरील कपडे काढण्यास सांगितले.
मुलीने कपडे काढण्यास नकार दिल्यावर, जिवेठर मारण्याचा दम दिला. कपडे काढून चिमुरडीवर अत्याचार केला.
मुलीने झालेला प्रकार आई-वडीलांना सांगितल्यावर, त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन, झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत