शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

त्यांनी स्वत:च्या रक्ताने चितारली स्वातंत्र्यवीरांची चित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 9:52 PM

एक अवलिया थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात शिक्षक आहे. त्याने बाबांच्या प्रेरणोतून स्वत:च्या रक्तातून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या विरांची चित्रे चितारली आहे.

 डोंबिवली - जगप्रसिद्ध चित्रकार व्हॅन गाँग याने स्वत:चा कान कापून स्वत:चेचे पोट्रेट तयार केले होते. चित्रकलेच्या दुनियेत त्याचे नाव आजही घेतले जाते. पण त्याच्या अवलियापणाला शोभेल असा एक अवलिया थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात शिक्षक आहे. त्याने बाबांच्या प्रेरणोतून स्वत:च्या रक्तातून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या विरांची चित्रे चितारली आहे. या शिक्षकाचे नाव प्रल्हाद ठक असे आहे.  या चित्रंचे प्रदर्शन डोंबिवलीतील बालभवन येथे भरले आहे. त्याला पाहण्यासाठी नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आनंदवनात शिक्षक असलेल्या ठक यांना थोर समाजसेवक बाबा आमटेचा सहवास लाभला. त्यांनी स्वत:च्या रक्ताने प्रथम बाबा आमटेचेच एक चित्र चित्तारले. हे पाहून बाबाही आवाक्  झाले. बाबानी त्याला स्वातंत्र विरांची चित्रे काढ. स्वातंत्र्य विरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले. त्यांची चित्रे रक्ताने चित्तारलशील तर ती खरी त्यांना श्रद्धांजली होईल. तसेच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल. ठक यांनी बाबांचा शब्द शीरसावंद्य मानला. त्यांनी स्वत:च्या रक्ताने स्वातंत्र्यविरांची 1क्2 चित्रे चित्तारली आहे. एका चित्रला आठ एमएल ते 16 एमएल रक्त लागते. सरासरी 12 एमएल रक्त लागले आहे. 2क्क्8 पासून त्यांनी ही चित्रे काढली आहेत. स्वातंत्र्य विरांच्या बलीदानाची रक्ताची किंमत नव्या तरुण पिढीला कळावी. यासाठी हे प्रयोग केला आहे. त्यांच्या चित्रचे प्रदर्शन डोंबिवलीच्या बालभवन येथे कालपासून सुरु आहे. डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार व विविसू डेहरा यांच्यातर्फे संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात सगळीच चित्रे मांडली नसून 85 चित्रे मांडण्यात आलेली आहे. त्याला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.     या प्रदर्शनात सुरेंद्रनाथ बनर्जी, लालबहादूर शास्त्री, राजेंद्रप्रसाद, जगदीश चंद्रबोस, सी.वी.रामन, लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, लालालजपत राय, रविंद्रनाथ टागोर, बकिंमचंद्र चट्टोपाध्याय, विनायक सावरकर, भिकाजी कामा, सरदार वल्लभभाई पटेल, शिवराम हरि राजगुरू, पंडित चंद्रशेखर आझाद, दादाभाई नौरोजी, सूयसेन, डॉ. पाडुरंग खानखोजे, तात्या टोपे, मंगल पांडे, आचार्य विनोबा भावे, पंडिता रमाबाई, महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले आदींची चित्रे पाहायला मिळतात. चौकट- ठक यांनी 2007 मध्ये जगातील सर्वात मोठी रांगोळी काढली होती. चंद्रपूर पोलिस परेड मैदानात साधारणपणो अडीच एकर जागेत ही रांगोळी काढली. त्यासाठी 13 ट्रक्टर रांगोळी लागली होती. या रांगोळीची लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद झाली आहे. 2015 मध्ये श्री गणोश मंदिर संस्थानात धान्याची रांगोळी त्यांनी काढली होती. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTeacherशिक्षकdombivaliडोंबिवली