Corona Vaccine: ठाण्यात लसीच्या साठ्यापैकी अर्धा साठा गायब; स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 06:59 PM2021-04-29T18:59:39+5:302021-04-29T19:00:52+5:30

विशेष म्हणजे २०० लस  उपलब्ध असताना केवळ १०० लस  का देण्यात आल्या ? या प्रश्नावर उर्वरित लसीचा साठा दोन नगरसेवक घेऊन गेले असल्याचे वादग्रस्त उत्तर या डॉक्टरांकडून  देण्यात आल्यानंतर हे उत्तर देखील खोटे असल्याचे सिद्ध झाले.

Half of the vaccine stockpile disappears in Thane; Revealed at the Standing Committee meeting | Corona Vaccine: ठाण्यात लसीच्या साठ्यापैकी अर्धा साठा गायब; स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उघड

Corona Vaccine: ठाण्यात लसीच्या साठ्यापैकी अर्धा साठा गायब; स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उघड

Next
ठळक मुद्देरेमडेसिवीर बरोबर लसीचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने लस उपलब्ध झाल्यास लसीकरण केंद्रांवर लांबच्या लांब रांगा लागत आहे.लसीकरण केंद्रावर २०० लस उपलब्ध होत्या. मात्र या ठिकाणी काम करत असलेल्या डॉक्टरांनी केवळ १०० टोकन देऊन या १०० लोकांनाच लस दिलीया दोन ते तीन दिवसात १०० लसीचा साठा गायब असल्याचा आरोप नरेश मणेरा यांनी केला असून या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

ठाणे : लसीच्या मर्यादित पुरवठ्यामुळे एकीकडे ठाणे महापालिकेला लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत असताना दुसरीकडे मात्र घोडबंदर येथील एका लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या लसीच्या साठ्यापैकी अर्धा साठा गायब केला जात असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उघड झाली आहे.  हा सर्व प्रकार शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांच्या समोर प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर झाला असून या केंद्रावर उपलब्ध असलेल्या २०० लसपैकी केवळ  १०० लस लाभार्थ्यांना देऊन उर्वरित १०० लस गायब करण्याचा प्रकार केंद्रावरील डॉक्टरांकडून केला जात असल्याची माहिती त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

विशेष म्हणजे २०० लस  उपलब्ध असताना केवळ १०० लस  का देण्यात आल्या ? या प्रश्नावर उर्वरित लसीचा साठा दोन नगरसेवक घेऊन गेले असल्याचे वादग्रस्त उत्तर या डॉक्टरांकडून  देण्यात आल्यानंतर हे उत्तर देखील खोटे असल्याचे सिद्ध झाले. लसीचा काळाबाजार तर होत नाही अशी शंका उपस्थित करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून डॉक्टरांवर कारवाईची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे . 

रेमडेसिवीर बरोबर लसीचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने लस उपलब्ध झाल्यास लसीकरण केंद्रांवर लांबच्या लांब रांगा लागत आहे. काही वेळा तर लस उपलब्ध न झाल्यास ते केंद्रच बंद ठेवण्यात येत असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शहरात एवढी गंभीर परिस्थिती असताना नगरसेवक नरेश मणेरा यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या महत्वाच्या प्रश्नाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. घोडबंदर येथील लसीकरण केंद्रावर हा गैरकारभार सुरु असल्याची माहिती त्यांनी स्थायी समितीला दिली आहे. या लसीकरण केंद्रावर २०० लस उपलब्ध होत्या. मात्र या ठिकाणी काम करत असलेल्या डॉक्टरांनी केवळ १०० टोकन देऊन या १०० लोकांनाच लस दिली. उर्वरित १०० लस बाबत स्वतः मणेरा यांनी विचारणा केली असताना दोन नगरसेवकांकडे या लस उपलब्ध असल्याचे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले . मात्र प्रत्यक्ष नगरसेवकांना देखील विचारणा करण्यात आल्यानंतर असा काही प्रकार झालाच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर १५० लोकांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे उत्तर देऊन या डॉक्टरांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या दोन ते तीन दिवसात १०० लसीचा साठा गायब असल्याचा आरोप नरेश मणेरा यांनी केला असून या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

हा सर्व धक्कादायक प्रकरानंतर आता लसीचा काळाबाजार होत नाही ना ? अशी शंका आता स्थायी समिती सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. यावर स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी या दोन्ही डॉक्टरांना त्यांच्या  दालनात स्थायी समितीची बैठक झाल्यानंतर बोलावण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Half of the vaccine stockpile disappears in Thane; Revealed at the Standing Committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.