शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

निम्मी रक्कम शासन भरणार

By admin | Updated: March 17, 2015 01:15 IST

राज्यात वीज बिल थकबाकीमुळे बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या बिलांची जवळपास अर्धी रक्कम शासन देईल आणि या योजना लवकरात लवकर सुरू करण्यात येतील,

मुंबई : राज्यात वीज बिल थकबाकीमुळे बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या बिलांची जवळपास अर्धी रक्कम शासन देईल आणि या योजना लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिले. या योजनांचा आढावा घेण्यास ऊर्जामंत्र्यांना सांगण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अनेक पाणी योजना बंद असल्याबद्दल दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी वरील आश्वासन दिले. याबाबतचा मूळ प्रश्न भाजपाचे प्रकाश भारसाकळे यांनी विचारला होता. अकोला जिल्ह्यातील अकोट शहर व तेल्हारा तालुक्याच्या पाणीपुरवठा योजनेच्या समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. या योजनेची दुरुस्ती लवकरच केली जाईल, असे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदांऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडेच ठेवण्याची मागणी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी केली. राज्यातील अन्य ठिकाणी ज्या पाणीपुरवठा योजना बंद आहेत, त्या लवकरात लवकर दुरु स्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लोणीकर यांनी सांगितले. पाणी नसलेल्या ठिकाणी टँकर पुरवण्याचे अधिकार तहसीलदारांना आम्ही दिले होते; परंतु या सरकारने हे अधिकार काढून टाकले असून, ते अधिकार पुन्हा प्रदान करावेत, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तहसीलदारांना हे अधिकार आधीच देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)