शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामचे अकाउंट हॅक करून तरुणींना अश्लील फोटो पाठवणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:04 IST

ठाण्यातील एका अल्पवयीन मुलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करुन त्यावर अश्लील फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करणाऱ्या रायगडमधील यश चोरगे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अनेक मुलींचा अशाप्रकारे विनयभंग केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देविनयभंगाचा गुन्हा दाखल

ठाणे : इन्स्टाग्रामचे अकाउंट हॅक करून तरुणींना अश्लील फोटो आणि मेसेज पाठवणा-या रायगड जिल्ह्यातील डोलवली (ता. खालापूर) येथील यश चोरगे (१९) या आरोपीला ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी कळव्यातून अटक केली. त्याला २८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.नौपाडा भागातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन पीडित तरुणीचे इन्स्टाग्रामचे अकाउंट यशने हॅक केले होते. त्याद्वारे तो त्याच्या अकाउंटवर अश्लील फोटो पोस्ट करत होता. तसेच अश्लील व्हिडीओदेखील अपलोड करून त्याने तिचा विनयभंग केला. याला कंटाळून तिने हा प्रकार पालकांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार, याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. याची गंभीर दखल घेत ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर आणि राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक बाबींच्या मदतीने गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने चोरगेला २३ आॅगस्ट २०१९ रोजी अटक केली. त्याचे लोकेशन रायगड येथील डोलवली गावात असल्याची माहिती मिळाल्यामुळे नौपाडा पोलीस त्या गावात पोहोचले. परंतु, तो ठाण्याच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून पाठलाग करून कळवानाका येथून त्यास ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस निरीक्षक शेरेकर याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. त्याने आणखी किती तरुणींचे इन्स्टाग्रामवरील अकाउंट हॅक करून असे विनयभंगाचे प्रकार केलेत, याबाबतचा तपास करण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच पोक्सो कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.........................

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग