बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 11:24 PM2024-03-06T23:24:17+5:302024-03-06T23:24:38+5:30

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज या मेळाव्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. रोजगार तरुणांना तसेच कुटुंबासाठी महत्वाचा असतो.

Government is committed to provide employment to unemployed youth – Chief Minister Eknath Shinde | बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 Chief Minister Eknath Shinde : ठाणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. हा देश तरुणांचा देश आहे. या तरुणांना योग्य दिशा आणि रोजगार देण्याचे काम हे शासन करीत आहे. यापुढेही करीत राहील, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ठाणे येथील मॉडेला मिल कंपाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका येथे कौशल्य विकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज या मेळाव्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. रोजगार तरुणांना तसेच कुटुंबासाठी महत्वाचा असतो. आज या मेळाव्यात 30 हजार तरुणांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात सरकारच्यावतीने 6 हजार तरुणांना रोजगार दिला जात आहे. नमो महारोजगार मेळाव्यामुळे तरुणांमध्ये उत्साही वातावरण आहे. देशातील पहिले संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधनीचे आज उद्घाटन होत आहे. या केंद्रातून दरमहा 2 हजार मुलांना स्वच्छतेविषयक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासन सर्वांसाठी काम करत आहे. दावोस मधून 3 लाख 73 हजार कोटींचे करार झाले. महाराष्ट्र अनेक विभागात पुढे आहे. राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत 700 दवाखाने सुरू केले. सर्वसामान्य माणसाच्या गरजा काय असतात, त्यांचे दुःख काय असते, याची मला माहिती आहे. म्हणूनच माझ्या इतर सहकारी मंत्र्यांच्या सहकार्याने हे शासन सर्वसामान्यांसाठी काम करीत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे.  राज्यात केंद्र शासनाच्या मदतीने अनेक लोकोपयोगी प्रकल्प सुरू आहेत.  ठाणे येथून लवकरच मेट्रो सुरू होणार आहे. राज्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. शासकीय नोकर भरती बंदी उठवली असून आतापर्यंत 1 लाख नोकऱ्या दिल्या असून 1 लाख स्वयंरोजगार  उभे केले आहेत.  यासाठी 11 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू यासारखे अनेक प्रकल्प निर्माण होत आहेत. यामुळे रोजगार वाढीसाठी चालना मिळणार आहे. उद्या देखील रोजगार मेळावा सुरु आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Web Title: Government is committed to provide employment to unemployed youth – Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.