शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
2
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
3
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
4
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
5
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
6
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
7
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
8
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
9
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
10
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
11
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
12
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
13
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
14
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
15
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
16
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
17
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
19
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
20
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा

प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीचा विनयभंग करणा-या तरुणाला ठाण्यात अटक

By जितेंद्र कालेकर | Published: October 22, 2018 9:59 PM

एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या तरुणीची काही महिन्यांपूर्वी ठाण्यात हत्या झाली होती. अशाच प्रकारे एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या होकारासाठी तिला चाकू दाखवून धमकावणाºया निहार बेलोसे याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देपाठलाग करुन विनयभंगआधी मैत्रि करुन नंतर प्रेमाचा प्रस्तावहोकारासाठी चाकूही दाखविला

ठाणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणा-या निहार बेलोसे (२१, रा. पाटीलवाडी,नौपाडा, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याने संबंधित मुलीला चाकू दाखवून मारण्याची धमकीही दिली होती.नौपाड्याच्या गणेशवाडी भागात राहणा-या या मुलीशी त्याची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीतूनच त्यांच्यात मैत्रिही झाली होती. पुढे त्याने तिला प्रेमासाठी होकार देण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकला. त्याच्या मागणीला तिने स्पष्ट नकार दिला होता. तरीही त्याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला होता. अगदी अलिकडेच ६ आॅक्टोंबर २०१८ रोजी दुपारी १२ वा. च्या सुमारास मित्रासोबत पाण्याची बाटली घेण्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या समोरील दुकानात जात असतांना त्याने तिला चाकू दाखवून धमकावले होते. ‘तू माझ्या सोबत चल, तू माझ्या घरच्यांना टॉर्चर करते, मी तुला सोडणार नाही,’ असे म्हणून धमकी देऊन तिचा विनयभंगही केला. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून तिने अखेर याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. याच तक्रारीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभांगी गवते यांच्या पथकाने त्याला २२ आॅक्टोबर रोजी अटक केली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बेलोसे हा वागळे इस्टेट पोलिसांना हुलकावणी देत होता. मोबाईल न बाळगता तो घरीही येत नव्हता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते...................प्राची झाडे सारखा प्रकार होण्यापूर्वी रोखलाया १९ वर्षीय तरुणीने निहारला स्पष्ट नकार देऊनही तो तिचा सतत पाठलाग करीत होता. तिच्या होकारासाठी त्याने तिला चाकूही दाखविला होता. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर तो घरीही मिळत नव्हता. त्याच्याकडे चाकू असल्यामुळे त्याला अटक होणे गरजेचे होते. त्याच्या अटकेमुळे प्राची झाडेसारखा प्रकार रोखता आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पठाण यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग