तौत्के वादळाचा फटका, पालघरमध्ये कोविड हॉस्पिटलला जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:32 PM2021-05-17T16:32:26+5:302021-05-17T16:33:02+5:30

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ताऊत या चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात दि.१५.०५.२०२१ ते दि.१९.०५.२०२१ या दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

A generator will supply power to covid Hospital in Palghar | तौत्के वादळाचा फटका, पालघरमध्ये कोविड हॉस्पिटलला जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा होणार

तौत्के वादळाचा फटका, पालघरमध्ये कोविड हॉस्पिटलला जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा होणार

Next

पालघर दि 17 : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ताऊत या चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात दि.१५.०५.२०२१ ते दि.१९.०५.२०२१ या दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोविड केअर सेंटर (CCC). इंडिकेटेड डि हेल्थ सेंटर (DCHC), डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल(DCH) चालू आहेत. विदयुत फिडर बंद असल्यामुळेकोरोना रुग्णांना अत्यावश्यक सुविधा निरंतर चालू ठेवणे आवश्यक आहे विदयुत पुरवठा निरंतर असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळामुळे फिडर बंद पडण्याची शक्यता असल्याने उपरोक्त हॉस्पिटलला जनरेटरद्वारे विदयुतपुरव ठेवणे आवश्यक असल्याने, जनरेटरसाठी पेट्रोल/डिझेलची मोठया प्रमाणात आवश्यकता लागणार असल्याने पेट्रोल/डिझेलसाठा राखीव ठेवणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व रिटेल पेट्रोल व डिझेल परवानाधारक यांनी दरदिवशी २००० लिटर डिझेल व ५०० लिटर पेट्रोल राखीव ठेवण्यात यावे. सदरचे डिझेल/पेट्रोल हे या कार्यालयाच्या / तहसीलदार यांचे आदेशाशिवाय वितरीत करता येणार नाही.

उपरोक्त आदेशाचे पालन न करणान्या कोणतीही व्यक्ती/परवानाधारकावर भारतीय दंडसंहोता १८६० (४५) याच्या कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व साथ रोग नियंत्रण कायदयातील तरतुदींप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी डॉ.  माणिक गुरसळ  यांनी पारित केलेल्या आदेशात नमूद केले आहे

Web Title: A generator will supply power to covid Hospital in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.