शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

गावित व्यक्तिगत पातळीवर सर्वात उजवे

By admin | Updated: February 6, 2016 02:02 IST

१३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीतील प्रमुख तीन उमेदवारांपैकी व्यक्तिगत पातळीवर सर्वात उजवे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांच्या नावाची चर्चा सध्या

पालघर: १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीतील प्रमुख तीन उमेदवारांपैकी व्यक्तिगत पातळीवर सर्वात उजवे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांच्या नावाची चर्चा सध्या मतदारांमध्ये दिसून येत आहे. सेनेचे अमित घोडा यांना आपल्या व्यक्तिगत करिश्म्याऐवजी उपयोगी पडणारा आहे तो वडिलांचा वारसा आणि साहजिकच सेनेचे पाठबळ. त्यांची स्वत:ची राजकीय, सामाजिक कार्यातही तशी विशेष ओळख नसल्याने घोडा यांच्या दृष्टीने ही थोडीशी कमकुवत बाजू समजली जात आहे. तर, मनीषा निमकर यांचे नाव सर्वत्र परिचित होते, ते सेनेच्या आमदार व राज्यमंत्री म्हणूनच असले तरी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशासनावर वचक निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनच त्यांची ओळख आहे.राजेंद्र गावित यांच्याबाबत मात्र बहुतांशी मतदारांमध्ये त्यांच्याबाबत आपुलकीची व आपलेपणाची भावना दिसून येते. भाजपाचे राम नाईक यांच्या काळात पक्षाबाहेरील मते मिळविण्यात यशस्वी होत असत. तसाच काहीसा प्रकार राजेंद्र गावितांबाबत घडत असल्याचे सांगता येईल. गावित यांना पक्षांतर्गत पाठिंबा आहे. तशीच त्यांना पक्षाबाहेरही एकमान्यता आहे. आपल्या सुखदु:खात कधीही उपलब्ध असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख हे त्यांचे मोठे भांडवल आहे. असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये, अर्थात कोणत्याही पक्षाची बांधीलकी नसणाऱ्या अशा वर्गातून तर त्यांना मान्यता आहेच, परंतु विविध पक्षांतूनही त्यांना मानणारा असा कार्यकर्त्यांचा एक छोटासा का होईना परंतु एक गट आहे. त्यामुळे सेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा सातपाटी, मुरबे, पालघर, टेंभोडे, वेवुर, दापोली, घोलवीरा इ. अनेक भागांतून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गावितांनी सेनेच्या उमेदवारापेक्षा अधिक मते मिळविली आहेत. त्यामुळे सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या या प्रतिमेने त्यांना विजयश्री मिळवून दिली होती आणि २०१४ च्या निवडणुकीमध्ये विजयाजवळ पोहोचविण्यातही त्यांच्या मतदारांमधील या प्रतिमेचे योगदान मोठे आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. पालघर जिल्हानिर्मिती आणि मतदारसंघासाठी विविध मार्गांतून आणलेला निधी त्याचबरोबरीने ज्येष्ठ नागरिक संघासह विविध समाजघटकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा अशा अनेक त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.