छेडछाडीचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 09:08 IST2018-10-06T09:05:23+5:302018-10-06T09:08:29+5:30

छेड काढणाऱ्यांना जाब विचारत विरोध करणाऱ्या अनरजीत सोनार या तरुणावर  प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

gang attack on man in kalyan | छेडछाडीचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला

छेडछाडीचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला

कल्याण -  पश्चिमेतील काळातलाव परिसरात शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणीची छेड काढण्यात आली. या छेड काढणाऱ्यांना जाब विचारत विरोध करणाऱ्या अनरजीत सोनार या तरुणावर  प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याच परिसरात छेडछाड विरोध करणाऱ्या हाजी शेख या तरुणांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर महिला आणि तरुणीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

काळा तलाव परिसरात नवरात्रोत्सव तयारी सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी याच परिसरातून जाणाऱ्या एका तरुणीची काही जणांनी छेड काढली. ही बाब या ठिकाणी असणाऱ्या अनरजित सोनार यांच्या लक्षात आल्याने त्याने छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी  सोनारवर प्राणघातक हल्ला केला. तरुणाला वाचवण्यासाठी गेलेल्या काकाला ही तरुणांनी मारहाण केली आहे.  सोनारवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: gang attack on man in kalyan