शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

फ्युनिक्युलर रेल्वे अडचणीत

By admin | Updated: November 15, 2016 04:32 IST

तालुक्यातील धार्मिकस्थळ असलेल्या श्री मलंगगड येथे डोंगरावर धावणाऱ्या फ्युनिक्युलर रेल्वेचा देशातील पहिला प्रकल्प राबवण्यात येत आहे.

अंबरनाथ : तालुक्यातील धार्मिकस्थळ असलेल्या श्री मलंगगड येथे डोंगरावर धावणाऱ्या फ्युनिक्युलर रेल्वेचा देशातील पहिला प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे काम २०१४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सध्या या प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. कामात मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याने आणि कंत्राटदार सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या आर्थिक समस्येमुळे हा प्रकल्प रखडला आहे. उर्वरित ३० टक्के काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली. श्रीमलंगगड हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. तेथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना दोन तास डोंगर चढावा लागतो. त्यामुळे इच्छा असूनही भाविकांना दर्शन घेता येत नाही. मलंगगडावर जाण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांना पालखीचा आधार घ्यावा लागतो. ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे तेथे भाविकांसाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज भासत होती. तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी या गडावर जाण्यासाठी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाला २००८मध्ये मंजुरी मिळाली. मात्र, मलंगगडावर रेल्वे प्रकल्प राबवण्यासाठी अनेक परवानग्या घेण्यातच चार वर्षे वाया गेली. अनेक अडचणींवर मात करत या प्रकल्पाचे काम सुरू झाले. परंतु, दोन वर्षांतच या प्रकल्पाला पुन्हा अडचणींमुळे ब्रेक लागला. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने कंत्राटदार कंपनीला सरकारने या प्रकल्पासाठी मुदतवाढ घ्यावी लागली. गडाच्या पायथ्याशी स्टेशन उभारणे आणि गडाच्या वर स्टेशन उभारण्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. गडावर जाण्यासाठी रेल्वे रुळांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, गडाच्या मुख्य डोंगरावर पिलर उभारण्यासाठी जागा नसल्याने तेथे डोंगरावरच दगड तोडून पिलरसाठी जागा केली आहे. दगड तोडण्यासाठी लागणारे कारागीर काम करण्यास येत नसल्याने हे काम रखडले आहे. काम होत नसल्याने कंत्रादाराने मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार, सरकारने हे काम पूर्ण करण्यास मार्च २०१७ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली असून कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)