शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीत नोकरीचे अमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 01:01 IST

बँकेत तसेच मोठया कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुण तरुणींकडून पैसे उकळणाऱ्या ठाण्यातील एका प्लेसमेंट कंपनीचे पितळ उघडे पडले आहे, या कंपनीने शेकडो बेरोजाराना नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकलल्या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे प्लेसमेंटच्या नावाखाली १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बँकेत तसेच मोठया कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरु ण तरु णींकडून पैसे उकळणाऱ्या ठाण्यातील एका प्लेसमेंट कंपनीचे पितळ उघडे पडले आहे, या कंपनीने शेकडो बेरोजाराना नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकलल्या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीच्या मालकांनी पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील दादा पाटील वाडी येथील किरण सोसायटी येथे एक खोली भाडयाने घेऊन या न्यू वर्क रिक्रूटमेंट या नावाने प्लेसमेंटची कंपनी सुरु झाली होती. सहा महिन्यांपूर्वीच सुरु झालेल्या या कंपनीने विविध सोशल मीडियाच्या वेबसाईटवर माहिती देऊन नोकरीच्या शोधात असणाºया बेरोजगारांना आपल्या जाळयात ओढायला सुरु वात केली होती. नोकरीच्या शोधातातील १९ वर्षीय तरुणीने एका जॉब साईटवर स्वत:ची माहिती आणि मोबाईल क्र मांक नोंदविला होता.२५ मार्च २०२१ रोजी निशा जाधव यांना एका महिलेने फोन करून न्यू वर्क रिक्रूटमेंट या प्लेसमेंट येथून बोलत असल्याचे सांगून निशा यांना बायोडाटा घेऊन ठाण्यातील कार्यालयात बोलविले. बँकेत चार जागा भरायच्या असल्याचे सांगून तिथे पाठविण्यासाठी त्यांच्याकडून तीन हजार रु पये घेण्यात आले. त्यानंतर बँकेचा पत्ता फोनद्वारे देण्यात येईल, असे सांगण्यात आले. काही दिवस उलटूनही या रिक्रूटमेंटकडून काहीच फोन न आल्यामुळे निशा यांनी ठाण्याचे ते कार्यालय गाठले. तिथे अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याचे त्यांना आढळले. त्यांच्याकडूनही त्यांनी पैसे उकळून अशीच बतावणी केली. ही कंपनी फसवी असल्याचे समजताच काही तरु णांनी स्थानिक समाजसेवक तुषार रसाळ यांच्या मदतीने नौपाडा पोलीस ठाण्यात ८ एप्रिल २०२१ रोजी तक्रार दाखल केली. २५ ते ३१ मार्च दरम्यान हा फसवणूकीचा प्रकार घडला असून अशा अनेकांची यामध्ये १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर या कंपनीच्या संचालकाने पोबारा केला आहे. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी