रंगांची उधळण करून नदीवर पोहण्यासाठी आलेल्या चौघांचा बुडून मृत्यू

By पंकज पाटील | Updated: March 14, 2025 18:30 IST2025-03-14T18:30:18+5:302025-03-14T18:30:37+5:30

एक जण बुडत असल्याची बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

Four people who came to swim in the river after playing Rangpanchami drowned to death | रंगांची उधळण करून नदीवर पोहण्यासाठी आलेल्या चौघांचा बुडून मृत्यू

रंगांची उधळण करून नदीवर पोहण्यासाठी आलेल्या चौघांचा बुडून मृत्यू

पंकज पाटील, बदलापूर:  बदलापूरच्या उल्हास नदी पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर आंघोळीसाठी हे चार तरुण उल्हास नदी पात्रात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास बदलापूरच्या राहटोली गावाजवळ असलेल्या पोद्दार संकुलातील काही तरुण रंगपंचमी खेळून झाल्यानंतर पोहण्यासाठी उल्हास नदीच्या पात्रात आले होते. त्यातील एक जण बुडत असल्याची बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाचवताना तीन मित्र देखील पाण्यात बुडाले.

दरम्यान, या चौघांचा बदलापूर अग्निशामक दलाच्याकडून कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

Web Title: Four people who came to swim in the river after playing Rangpanchami drowned to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.