रुग्णाच्या संपर्कातील चौघांना संसर्ग, आणखी ५० नागरिक क्वॉरंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:49 AM2020-04-26T00:49:56+5:302020-04-26T00:50:13+5:30

लोकमान्यनगरातील एकाचा कोरोना चाचणीचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेने लोकमान्य आणि सावरकरनगर, शास्त्रीनगर रविवारपर्यंत बंद करून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन ६० हून अधिक नागरिकांना क्वॉरंटाइन केले.

Four of the patient's contacts were infected, and another 50 were quarantined | रुग्णाच्या संपर्कातील चौघांना संसर्ग, आणखी ५० नागरिक क्वॉरंटाइन

रुग्णाच्या संपर्कातील चौघांना संसर्ग, आणखी ५० नागरिक क्वॉरंटाइन

Next

ठाणे : लोकमान्यनगरातील मृत झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ६० हून अधिक नागरिकांना पालिकेने क्वॉरंटाइन केले आहे. त्यातील एका वैद्यकीय कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर आणखी त्याच्या चार नातेवाइकांना लागणी झाली आहे. तर, दुसरीकडे सीपी तलाव परिसरातील मुलासह पिता आणि आणखी चार जणांना लागण झाल्यानंतर त्यांच्याही नात्यातील ५० नागरिकांना भार्इंदरपाडा येथील विलगीकरण कक्षात ठेवले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
लोकमान्यनगरातील एकाचा कोरोना चाचणीचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेने लोकमान्य आणि सावरकरनगर, शास्त्रीनगर रविवारपर्यंत बंद करून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन ६० हून अधिक नागरिकांना क्वॉरंटाइन केले.
त्यानंतर शुक्रवारी त्याच्या संपर्कात आलेल्या कळवा रुग्णालयातील एका वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिला कर्मचाºयालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आता त्याच्या संपर्कातील ज्या ६० नागरिकांना क्वॉरांटाइन केले होते. त्यातील चार जणांनाही आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आणखी किती जण प्रशासन आणि काही नागरिकांच्या चुकीचे धनी होणार, याकडे लक्ष लागले आहे.
>दुसरीकडे सीपी तलाव परिसरातील एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या वडिलांना आणि कुटुंबातील अन्य दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. आता या सर्वांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुुटंबातील तब्बल ५० नागरिकांना पालिकेने शोधून त्यांनाही विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

Web Title: Four of the patient's contacts were infected, and another 50 were quarantined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.