शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

एमपीतून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक, ठाणे गुन्हे शाखेने जप्त केला दोन कोटी २४ लाखांचा मुद्देमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:22 IST

Thane Crime News: मध्य प्रदेशातून मेफेड्रॉन एमडीची तस्करी करणाऱ्या इम्रान ऊर्फ बब्बू खान (३७) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून एक किलो ७१ ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाच्या एमडीसह दोन कोटी २४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली.

ठाणे -  मध्य प्रदेशातून मेफेड्रॉन एमडीची तस्करी करणाऱ्या इम्रान ऊर्फ बब्बू खान (३७) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून एक किलो ७१ ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाच्या एमडीसह दोन कोटी २४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली.

अमली पदार्थ विक्रीबाबत विशेष मोहीम राबवून कडक कारवाईचे आदेश ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले  आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपायुक्त जाधव, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र दौंडकर आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल मस्के यांनी विशेष मोहीम राबविली. तपास सुरू असताना हवालदार अमित सकपाळ यांना तस्करांची माहिती मिळाली. त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी चरईतील एमटीएनएल कार्यालयासमोर एमडी तस्करीसाठी आलेल्या इम्रान याच्यासह वकास खान (३०), ताकुद्दीन खान (३०) आणि कमलेश चौहान (२३) यांना ताब्यात घेतले. 

सराईत आराेपींना  १५ नाेव्हेंबरपर्यंत काेठडी  तस्करीसाठी वापरलेल्या एका कारसह दोन कोटी २४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला. एमडीचे उत्पादन, विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांमध्ये आणखी कोणा कोणाचा समावेश आहे? याचा तपास करण्यात येत असल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले. आरोपींना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. आराेपींपैकी इम्रान आणि कमलेश हे दोघे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Four arrested in Thane for smuggling drugs from Madhya Pradesh.

Web Summary : Thane police arrested four, including Imran Khan, for smuggling mephedrone from Madhya Pradesh. They seized MD worth ₹2.24 crore, along with a car. Further investigation is underway to identify other involved individuals.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे