Former MLA Jyoti Kalani, Aryan Lady of Ulhasnagar, died of a heart attack | उल्हासनगरच्या आयर्न लेडी माजी आमदार ज्योती कलानी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

उल्हासनगरच्या आयर्न लेडी माजी आमदार ज्योती कलानी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ठळक मुद्देउल्हासनगरात १९८६ वर्षानंतर पप्पू कलानी राज उद्यायास आल्यानंतर, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या म्हणून ज्योती कलानी यांची ओळख होती.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : पप्पू कलानी जेल मध्ये जाऊनही कलानी परिवाराचा दबदबा शहरात निर्माण करणाऱ्या आयर्न लेडी माजी आमदार, माजी महापौर ज्योती कलानी यांचे वयाच्या ६९ वय वर्षी राहत्या घरी सायंकाळी ७ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शहर विकासाठी झटणाऱ्या ज्योती कलानी यांची आर्यन लेडी म्हणून ओळख असून त्या शेवट पर्यंत राष्ट्रवादी पक्षाच्या सक्रिय पदाधिकारी राहिल्या आहेत.

उल्हासनगरात १९८६ वर्षानंतर पप्पू कलानी राज उद्यायास आल्यानंतर, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या म्हणून ज्योती कलानी यांची ओळख होती. मारोती जाधव हत्याकांडा नंतर पती पप्पू कलानी जेल मध्ये गेले. त्यानंतर, कलानी राज संपुष्टात आले. असे आवाई उठविण्यात आली. मात्र ज्योती कलानी यांनी पप्पू कलानी यांचें राजकीय साम्राज्य यशस्वीपने सांभाळले. जेल मध्ये असतांना पप्पू कलानी यांना दोन वेळा आमदार पदी निवडून आणले. तसेच नगरपरिषदेचे रूपांतर महापालिकेत होण्यापूर्वी १९९५ साली त्यांनी यूपीपी स्थानिक पक्षाची स्थापना करून नगराध्यक्ष पदी निवडून आल्या. महापालिका झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते म्हणून यशस्वीपणे काम केले. 

पप्पू कलानी जेल मधून बाहेर आल्यानंतर ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून शहरजिल्हाध्यक्ष पद भूषवून महापालिकेत सत्ता स्थापन केली. सलग ७ वेळा त्या स्थायी समिती सभापती पदी राहण्याचा विक्रम केला. सन २००५ साली त्या महापौर पदी निवडून आल्या. दरम्यान कलानी कुटुंबाचे जवळचे सहकारी त्यांना सोडून गेल्यावर महापालिकेतून त्यांची सत्ता गेली. तसेच आमदार पदी पप्पू कलानी यांचा दारुण पराभव झाला. त्या पाठोपाठ भतीजा बंधू हत्याकांड प्रकरणी पप्पू कलानी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पती पप्पू कलानी जेल मध्ये असतांना व जुने बहुतांश सहकारी सोडून गेले असतांना, ज्योती कलानी यांनी कलानी कुटुंबाचा दबदबा शहरात कायम ठेवला. सन २०१४ साली देशात व राज्यात भाजपा मोदींची लाट असताना त्या राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर आमदार पदी निवडून आल्या. त्या आमदार पदी निवडून आल्यावर, कलानी कुटुंबाचे आकर्षण जादू शहरात कायम असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाणवले.

 महापालिका निवडणुकी पूर्वी मुलगा ओमी कलानी यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करून स्वतःची ओमी कलानी टीमची स्थापना केली. राष्ट्रवादी ऐवजी थेट विरोधी असलेल्या भाजपा सोबत आघाडी करून महापालिका सत्तेत आले. तसेच सुनबाई पंचम कलानी ह्या महापौर पदी विराजमान झाल्या. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कलानी कुटुंबाला उमेदवारी नाकारल्याने, त्यांनी ऐन वेळेवर राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवली. थोड्या मताच्या फरकाने त्यांचा पराभव होऊन भाजपचे कुमार आयलानी आमदार पदी निवडून आले.

 *भाजपाची सत्ता घालविली.

विधानसभेची उमेदवारी कलानी कुटुंबाला नाकारली. याचा वचपा म्हणून ओमी कलानी यांच्या समर्थक नगरसेवकांनी महापालिका महापौर निवडणुकीत भाजपा उमेदवारा ऐवजी शिवसेनेच्या लिलाबाई अशान याना मतदान करून महापौर पदी दिवडून आणले. तसेच उपमहापौर पदी रिपाइंचे भगवान भालेराव निवडून आले. बहुमत असताना भाजपची महापालिकेवरील सत्ता उलथून टाकली.

 *भाजप व शिवसेना नेते कलानी महालात 

पप्पू कलानी यांच्या विरोधात राजकारण करणाऱ्या शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी महापालिका व खासदार पदाच्या निवडणुकी वेळी कधीनव्हे, न चढलेली कलानी महालच्या पायऱ्या झिजविल्या. अशी टीका सर्व स्तरातून झाली. मात्र सत्तेसाठी शिवसेना व भाजपने टीका पचवून घेऊन कलानी कुटुंबा सोबत एकत्र आल्याचे चित्र शहरवासीयांनी पाहिले. 

* पप्पू कलानी येणार का?
 

शहराचे माजी आमदार पप्पू कलानी जन्मठेपेची शिक्षा भोगत असून पत्नीचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी त्यांना जेल मधून सोडणार का? असा प्रश्न कलानी समर्थक विचारात आहेत. सर्वांना पप्पू कलानी यांच्या येण्याकडे डोळे लागून राहिले आहे. 

गेल्या काही वर्षा पासून तब्येत नरम-गरम असलेल्या ज्योती कलानी मात्र राष्ट्रवादीच्या प्रत्येक बैठकीला जात होत्या. त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घरी हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. कलानी यांच्या मृत्यूने शहरातील राजकारणात पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया नामांकीतांनी दिली. शिवसेना, भाजपा, रिपाइं, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह अन्य पक्षातील नेत्यांनी कलानी महलकडे धाव घेऊन कलानी कुटुंबाचे सांत्वन केले.

Web Title: Former MLA Jyoti Kalani, Aryan Lady of Ulhasnagar, died of a heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.