शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

ठाण्यात चॉकलेटच्या बहाण्याने पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 7:22 PM

घरात खेळण्यासाठी आलेल्या एका पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणा-यास चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देघरात खेळण्यासाठी आलेल्या मुलीला हेरलेगेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता प्रकारतक्रारीनंतर अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांची कारवाई

ठाणे: नामांकित कंपनीचे चॉकलेट देण्याच्या अमिषाने एका पाच वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे करणा-या जनार्दन कापसे याला चितळसर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.घोडबंदर रोडवरील एका इमारतीमध्ये ही पिडीत मुलगी आणि आरोपी जनार्दन वास्तव्याला आहेत. त्याच्याकडे खेळण्यासाठी इमारतीमधील बरीच मुले जमा होत होती. मुले खेळायला आल्यानंतर कालांतराने तो इतर मुलांना बाहेर जायला सांगून या मुलीशी लैंगिक चाळे करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. तिला त्रास झाल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. तिने याप्रकरणी १६ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास चितळसर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली. १३ डिसेंबर रोजी तसेच त्याआधीही त्याने हा प्रकार केल्याचे तिने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेत पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तो पसार झाला होता. अखेर शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याला घरातूनच पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, उपनिरीक्षक एम. डी. कड यांच्या पथकाने अटक केली. पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा