दीड वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:18 AM2017-12-11T05:18:49+5:302017-12-11T05:18:58+5:30

अज्ञात नराधमाने दीड वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि शहरानजीकच्या शेलार मीठपाडा येथे सोडून दिले.

 One-and-a-half year old girl tried for abuse | दीड वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न

दीड वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : अज्ञात नराधमाने दीड वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि शहरानजीकच्या शेलार मीठपाडा येथे सोडून दिले. पीडित मुलीची ओळख पटली नसून पोलिसांनी तिला उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.
शहरालगत शेलार मीठपाडा येथील खेमीसती डाइंगलगत पार्किंग केलेल्या टेम्पोत शनिवारी सकाळी चिमुरडीच्या रडण्याचा आवाज आला. टेम्पोचालकाने मुलीला जवळ घेऊन शेजाºयांच्या मदतीने मुलीच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीचे पालक सापडले नाहीत. त्यामुळे तिला तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शहरातील इंदिरा गांधी रु ग्णालयात नेले. तपासणीत चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे रुग्णालयातील बालतज्ज्ञांनी चिमुरडीच्या अंगावरील कपडे तपासणीसाठी प्रयोगशाळेत दिले आहेत, अशी माहिती डॉ. डोंगरे यांनी दिली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  One-and-a-half year old girl tried for abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.