शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

CoronaVirus News: आधी कोरोनाशी, आता मदतीसाठी लढा; कोरोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांच्या नशिबी संघर्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 11:41 PM

सरकारी मदत मिळाली नसल्याने कुटुंबे झाली हतबल

- जितेंद्र कालेकरठाणे : कोरोनाच्या काळातील बंदोबस्तात झोकून देऊन पोलीस नाईक श्रीकांत वाघ यांनी ड्युटी बजावली. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कर्तव्यावर असतानाच कोरोनामुळे ते शहीद झाले. सरकारी मदतीची रक्कम मंजूर झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळालेली नाही. माझा माणूस गेला! खूप हताश झाले... अशी हतबलता खाकी वर्दीतल्या या कोविडयोद्धयाची पत्नी संगीतिका श्रीकांत वाघ यांनी व्यक्त केली.कोरोनाची चाचणी करण्याआधी दीड आठवड्यांपासून श्रीकांत यांना सर्दी, खोकला, खांदेदुखी आणि दम लागणे, असा त्रास होत होता. सुरुवातीला त्रास जाणवल्यानंतर कळवा येथील रुग्णालयात त्यांनी औषधोपचार सुरू केले होते. १९ आॅगस्ट रोजी रात्रपाळी करून २० आॅगस्ट रोजी सकाळीच घरी गेल्यानंतर श्रीकांत यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल त्याचवेळी मिळाला. श्रीकांत यांच्यामागे पत्नी, श्रुती (२७) आणि श्रेया (२५) या दोन मुली आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ५० लाखांचे अनुदान जाहीर केले. ते मंजूर झाल्याचे वाघ कुटुंबीयांना सांगण्यात आले आहे, पण ते कधी आणि कोण देणार, याची कोणतीच माहिती नाही. त्यामुळे अजून सरकारी मदत, भविष्य निर्वाह निधी यापैकी कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याचे संगीतिका यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या