शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी तालुक्यात अग्नितांडव सुरूच; मेणबत्तीसह लोबानच्या गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 15:56 IST

शेष म्हणजे लोबान (धूप) व मेणबत्तीचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने या साठ्याला लागलेल्या आगीने त्वरित पेट घेतला.

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडी तालुका जणू काही ज्वालामुखीचा तालुका ठरू पाहत आहे,  या तालुक्यात आगीचे सत्र सुरु असून सोमवार व मंगळवारी आगीच्या चार घटना घडल्या असतांनाच बुधवारी दुपारच्या सुमाराला पुन्हा मेणबत्तीसह लोबान साठवून ठेवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हि घटना भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायतींच्या वळपाडा येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील गोदामात घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यत लाखोंचा मेणबत्ती व लोबानचा साठा जळून खाक झाला होता. 

विशेष म्हणजे लोबान (धूप) व मेणबत्तीचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने या साठ्याला लागलेल्या आगीने त्वरित पेट घेतला. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. यामुळे गोदामाच्या लगत असलेल्या इतर गोदामांनाही आगीची झळ पोहचण्या आधीच स्थानिक पंचायत समिती सदस्य विकास भोईर यांनी खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करीत कामगारांच्या मदतीने आगीवर पाणी मारीत आग आटोक्यात ठेवल्याने ती इतर गोदामा पर्यंत पोहचू न देण्याचा प्रयत्न केल्याने इतर गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्या पासून वाचविण्यात यश आल्याने कोट्यवधी रुपयाचे नुकसान टळले असून हि आग नेमकी कशा मुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दरम्यान भिवंडी महापालिकेच्या अग्निशमदलाची अवघी एक गाडी आज आग लागल्यानंतर घटनास्थळावर आली होती, मी स्वतः गावातील आठ ते दहा पाण्याचे टँकर मागवून या आगीवर नियंत्रण मिळवले , जर स्थानिक टँकर मिळाले नसते तर आज मोठा अनर्थ झाला असता अशी प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती व सदस्य विकास भोईर यांनी दिली आहे. 

टॅग्स :fireआग