भिवंडीमध्ये तागाच्या गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 20:23 IST2020-12-20T20:22:56+5:302020-12-20T20:23:03+5:30
Fire broke out: भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या प्रेरणा कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली.

भिवंडीमध्ये तागाच्या गोदामाला भीषण आग
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या प्रेरणा कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली. या इमारतीमध्ये तागाचे गोदाम आहे, त्याला आग लागल्याने रौद्र रुप धारण केले होते.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन जवानाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.