भिवंडीत भंगार गोदामात अग्नितांडव,15 ते 16 गोदामं जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 08:47 IST2018-01-31T08:13:19+5:302018-01-31T08:47:52+5:30

भिवंडीतील गायत्रीनगर परिसरातील भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे.

Fire broke out at a godown in Bhiwandi's Gayatri Nagar area | भिवंडीत भंगार गोदामात अग्नितांडव,15 ते 16 गोदामं जळून खाक

भिवंडीत भंगार गोदामात अग्नितांडव,15 ते 16 गोदामं जळून खाक

भिवंडी - भिवंडीतील गायत्रीनगर परिसरातील भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे.  सरदार कंपाऊंड येथील ही घटना आहे.  मंगळवार (30 जानेवारी) रात्रीच्या सुमारास ही आग लागली होती. अद्यापही याठिकाणी आग धुमसतच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
दुर्घटनेत 15 ते 16 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आग लागण्याचं नेमकं  कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. 
दरम्यान, परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी भिवंडी,कल्याण व उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.  
 



 



 

Web Title: Fire broke out at a godown in Bhiwandi's Gayatri Nagar area