भिवंडीत डाइंगला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 23:11 IST2020-02-06T23:11:12+5:302020-02-06T23:11:57+5:30

भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील आसबीबी परिसरात असलेल्या रुंगटा डाइंगला गुरु वारी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

Fire broke out at a building in Bhiwandi, earlier today. 6 fire tenders at the spot | भिवंडीत डाइंगला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

भिवंडीत डाइंगला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

भिवंडी : भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील आसबीबी परिसरात असलेल्या रुंगटा डाइंगला गुरु वारी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग अतिशय भीषण असून, ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आसबीबी रोडवर तीन मजल्यांची रुंगटा डाइंग असून डाइंगच्या तिसऱ्या मजल्याला दुपारी भीषण आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने दूरपर्यंत आगीचे लोळ पसरले होते. या डाइंगच्या बाजूलाच नागरी वस्ती व यंत्रमाग कारखाने असून या भीषण आगीमुळे नागरिक
व यंत्रमाग कामगारांमध्ये खळबळ उडाली.

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अजून समजू शकले नाही. या आगीत कपडा, केमिकल आणि कपड्यावर प्रक्रिया
करणारी यंत्रसामग्री जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या. 

Web Title: Fire broke out at a building in Bhiwandi, earlier today. 6 fire tenders at the spot