ठाण्यात रॉयल एनफिल्डला किक मारताना लागली आग; आगीने दोन मीटर बॉक्स पेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 23:31 IST2022-07-14T23:31:34+5:302022-07-14T23:31:53+5:30
रॉयल एनफिल्ड क्लासिक बाईकचे मालक राजन शिरवाडकर हे किक मारत असताना आग लागली.

ठाण्यात रॉयल एनफिल्डला किक मारताना लागली आग; आगीने दोन मीटर बॉक्स पेटले
ठाणे : जुन्या रॉयल एनफिल्ड क्लासिक बाईकला किक मरून चालू करत असताना अचानक आग लागून त्यावर ठेवलेले कपडे पेटल्याची घटना गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पाचपाखाडी, कौशल्य रूग्णालय जवळील शिरवाडकर चाळीत घडली. या घटनेत बाजूच्या घराच्या भिंतीवरील महावितरणच्या २ मीटर बॉक्सलाही आग लागली. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
रॉयल एनफिल्ड क्लासिक बाईकचे मालक राजन शिरवाडकर हे किक मारत असताना आग लागली. यावेळी बाजूच्या घरातील मीटर बॉक्सने पेट घेतल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळताच, घटनास्थळी महावितरण कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तात्काळ महावितरण कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला व अग्निशमन दलाच्या जवनांनी मीटर बॉक्सला व बाईकला लागलेली आगीवर नियंत्रण मिळविले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.