भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
By नितीन पंडित | Updated: October 2, 2025 00:22 IST2025-10-02T00:21:44+5:302025-10-02T00:22:15+5:30
लाखो रुपयांच्या वह्यांसह कागद, पुठ्ठा, कच्चा माल जळून खाक

भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यातील मानकोली गावाच्या हद्दीतील हरिहर कंपाऊंड मधील ई-१५ ए या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पहिल्या मजल्यावर वह्या बनविणाऱ्या कंपनीत ही आग लागली. चित्रकला नावाची वह्या बनविणारी ही कंपनी असून तेथे वह्या बनविण्यात येत होत्या. या आगीच्या दुर्घटनेत गोदामातील लाखो रुपयांच्या किमतीचा वह्यांसह कागद पुठ्ठा असा कच्चा माल जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.