Fire at Asangaon plastic company; Two units burned | आसनगावच्या प्लॅस्टिक कंपनीला भीषण आग; दोन युनिट जळाले

आसनगावच्या प्लॅस्टिक कंपनीला भीषण आग; दोन युनिट जळाले

आसनगाव : आसनगाव येथे सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास प्लॅस्टिक कंपनीला आग लागली. यामध्ये दोन युनीट जळून खाक झाले आहेत. तिसऱ्या युनिटलाही आगीने वेढले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. (Maharashtra: Fire breaks out at a plastic factory in Asangaon area of Thane, 12 fire engines rushed to the spot.)


कल्याण भिवंडी पालिका आणि जिंदाल ग्रुपचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, प्लॅस्टिक असल्याने दोन युनिटना त्याची मोठी झळ बसली. आग विझत आलेली असताना तिसऱ्या युनिटने पुन्हा पेट घेतला. प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात आहे. घटनास्थळी कल्याण अग्निशमन केंद्राचे १-फा. वा. व डोंबिवली अ. केंद्राचे १-फा. वा. उपस्थित असून अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर घटनास्थळी मदतीची आवश्यकता असल्याने सदर घटनास्थळी सकाळी ०९:५२ वा. सुमारास ठाणे अ. दलातील बाळकूम अ. केंद्राचा १ जम्बो वॉटर टँकर रवाना झाला आहे .

Web Title: Fire at Asangaon plastic company; Two units burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.