शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे रोगराईची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 12:54 AM

लॉकडाऊनमुळे ठप्प : पाणी तुंबून डोंबिवलीमध्ये साथीचे आजार बळावण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील बहुतांश ठिकाणी केडीएमसी आणि अन्य प्राधिकरणांकडून रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण, मलवाहिनी आणि अन्य सुविधा देण्यासंदर्भात खोदकामे सुरू होती. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये ही कामे ठप्प झाली.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पावसाळ्यापूर्वी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची अर्धवट स्थितीतील कामे मार्गी लावण्यासंदर्भात हिरवा कंदील दाखवला असला, तरी काही ठिकाणची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे याठिकाणी पावसाच्या पाण्याची डबकी तयार होऊ न साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

मागील पावसाळ्यात खड्ड्यांनी वाहनचालकांचे कंबरडे मोडले. हिवाळा आणि आता उन्हाळ्यातही खोदकामांचा सिलसिला सुरूच राहिला. अनेक महिने हे रस्ते वाहतुकीपासून बंद ठेवावे लागले असून ठाकुर्लीतील ९० फूट रोडवर हे चित्र आजही कायम आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याने कामांना विलंब लागत असल्याचे कारण दिले जात होते. आता कोरोनामुळे या कामांना पूर्णपणे खीळ बसली आहे. अर्धवट कामे झालेले काही रस्ते वाहतुकीसाठी अजूनही बंद आहेत. पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे म्हणून महापालिका आयुक्तांनी रस्त्यांवरील खड्डे डांबराच्या पॅचने भरणे आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिले होते. यातील काही कामे सुरू झाली, तर काही अर्धवट स्थितीत ‘जैसे थे’च आहेत.तात्या माने यांचे आयुक्तांना पत्रपूर्वेकडील गोपाळनगर परिसरात रस्त्याचे सिमेंट काँक्रिटचे काम अर्धवट स्थितीत आहे. हे काम तातडीने सुरू करून मार्गी लावण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. माजी नगरसेवक तात्या माने यांनी याप्रकरणी आयुक्तांना पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले आहे. फेब्रुवारीपासून हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामासाठी खोदला आहे. आता रस्त्याची कामे सुरू होऊनही हे काम सुरू झालेले नाही. या अर्धवट कामांमुळे पाणी साठून अन्य साथीचे रोग पसरण्याची भीती असल्यामुळे आपण स्वत: पाहणी करावी आणि तातडीने काम पूर्ण करावे अशी मागणी माने यांनी आयुक्तांना केली आहे.