शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

किल्ले सिंहगडावर रंगला निरोप समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:39 AM

संकल्प इंग्लिश स्कूलचा उपक्रम : जयभवानी, जयशिवाजीचा जयघोष

ठाणे : शाळेचा निरोप समारंभ म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनात एकीकडे दु:ख तर एकीकडे नव्या जगात प्रवेश करण्याची ओढ, आतुरता असते. निरोप समारंभ हा पुढील आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरावा या उद्देशाने ठाण्यातील संकल्प शाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हा किल्ले सिंहगडावर झाला. ऐतिहासिक खेळांचे प्रदर्शन, गडाची सफर आणि जयभवानी, जय शिवाजीचा जयघोष अशा उत्साहाने भारलेल्या वातावरणात संकल्प इंग्लिश स्कूलच्या १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला.

अखंड महाराष्टÑाचे दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. राजांचे शौर्य आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष अनेक गडकिल्ले देतात. स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या स्मृतीदिनानिमित्त संकल्प स्कूलच्या १० वीच्या विद्यार्थ्यांना सिंहगडावर नेण्यात आले होते. यावेळी तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासमोर विद्यार्थ्यांनी दांडपट्टा, लाठीकाठी, तलावारबाजी अशा ऐतिहासिक खेळांचे प्रदर्शन केले. कोंढाण्याच्या लढाईचा थरार विद्यार्थ्यांनी पोवाड्यातून सादर करून तानाजी मालुसरे यांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांना गडावरील कल्याण दरवाजा, टिळक बंगला, देवटाके, कोंढाणेश्वर मंदिर, डोणागिरीचा कडा, दारूकोठार अशा अनेक स्थळांचे दर्शन घडवले गेले. यावेळी जयभवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांसह संस्थापक डॉ.राज परब, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.उज्ज्वल भविष्याची सुरुवातच्हा निरोप समारंभ नसून विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याची सुरूवात ठरेल. महाराजांची मूल्यनिष्ठा, कणखर बाणा विद्यार्थ्यांनी अंगी बाणवावा, या उद्देशानेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी नेण्यात आले होते, असे संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा