'Famine' even in the midst of crisis; Salt on peasant wounds | संकटग्रस्तांच्या मदतीतही ‘दुष्काळ’; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
संकटग्रस्तांच्या मदतीतही ‘दुष्काळ’; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

- नारायण जाधव

ठाणे : क्यार व महा या चक्रीवादळांमुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोसळलेल्या अवेळी पावसामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची १०० टक्के शेती नष्ट होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यामुळे ओल्या दुष्काळाचे संकट असून दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने शेतपिकांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करून आपले अहवाल राज्य शासनाकडे पाठविले. त्यानुसार सध्या राष्ट्रपती राजवटीच्या वरवंट्याखाली चिरडलेल्या या दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी राज्य शासनाने राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन्ही जिल्ह्यांसाठी अवघी १७ कोटी ९३ लाख ७६ हजार इतकी तुटपुंजी मदत वितरित करून मीठ चोळले आहे.
यात ठाण्याचा वाटा आठ कोटी २० लाख ६८ हजार तर पालघरचा हिस्सा नऊ कोटी ७३ लाख आठ हजार रुपयांचा आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच ती देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील
भातपिकाच्या नुकसानीपोटी सुमारे ३३ कोटी ८० लाख ९६ हजार रुपये
वरी पिकाच्या ३७ हेक्टरच्या नुकसानीसाठी दोन लाख ९६ हजार रुपये
नागलीच्या १२७ हेक्टरवरील नुकसानीसाठी १० लाख १६ हजार
रायगड जिल्ह्याला अवघी पाच कोटी १७ लाख १४ हजार इतकी नुकसानभरपाई मिळणार आहे.

असे अंदाजे ३४ कोटींची नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात राज्य शासनाने सोमवारी ठाणे जिल्ह्यांकरीता अवघी आठ कोटी २० लाख ६८ हजार नुकसानभरपाई वितरीत करून संकटग्रस्त शेतकºयांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळले आहे.

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांसाठी ही मदत दोन हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार इतकी आहे. यात शेतपिकांसाठी हेक्टरी ८ हजार तर फळबागांसाठी ती हेक्टरी १८ हजार इतकी तुटपुंजी आहे.

77128 शेतकºयांचे अवेळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार ४२६.३१ हेक्टर शेतमालाचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून यापोटी सुमारे ३४ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळावी, असा अहवाल पाठविला होता.

३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्यांना भरपाई नाही
विशेष म्हणजे जी तुटपुंजी मदत केली आहे ती प्रचलित शासने नियमानुसार 33 टक्के किंवा त्याहून जास्त ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकºयांनाच मिळणार असून याठिकाणीही ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकºयांना कोणतीही नुकसान मिळणार नसल्याने शेतकºयांत संताप व्यक्त होत आहे.

मच्छीमार मदतीच्या प्रतीक्षेत
पालघरमध्ये शेतकºयांसह मच्छिमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकºयांना तुटपुंजी मदत जाहिर करणाºया शासनाने मच्छिमारांना कोणतीच मदत वितरीत केलेली नाही. हिच अवस्था ठाणे जिल्ह्यातील मच्छिमारांचीही आहे. त्यांना नुकसानभरपार्ई कधी मिळणार, या प्रतीक्षेत दोन्ही जिल्ह्यांतील मच्छिमार आहेत.

पालघर जिल्ह्यातही परतीच्या पावसाने सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जुन्या शासकीय निकषानुसार ३५ - ४० कोटी रु पयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तेथील जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र, प्रत्यक्षात पालघरच्या वाट्याला नऊ कोटी ७३ लाख आठ हजार रुपयांचीच नुकसानभरपाई शासनाने वितरीत केली आहे.

दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकºयांना सोडले वाºयावर
अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकºयांची १०० टक्के शेती नष्ट झाली असली तरी राज्य शासनाने मदत देतांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत वितरीत केली आहे. ज्यांचे दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्यांना त्यापेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई न देता शासनाने वाºयावर सोडले आहे.

Web Title: 'Famine' even in the midst of crisis; Salt on peasant wounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.